याेगाला खेळाचा दर्जा : संघटनांचे मार्केट खुले; अवघ्या 10 हजारांत राज्य संघटनांना मेंबरशिप

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, दि.३: पारंपरिक आणि ऐतिहासिक महत्त्व लाभलेल्या याेगाला आता खेळाचा दर्जा मिळाला आहे. गत महिन्यात १७ डिसेंबर राेजी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने या दर्जाची घाेषणा केली. मात्र, याच घाेषणेनंतर याेगाच्या संघटनांसाठी देशभरात अख्खा बाजार खुला झाला आहे. यातूनच अवघ्या दाेन आठवड्यांमध्ये १०० पेक्षा अधिक संघटनांना यासाठी नाेंदणी केली आहे. याशिवाय या देश पातळीवरच्या संघटनांना थेट आपल्याशी संलग्न हाेण्यासाठी राज्य संघटनांना आॅफर जाहीर केली. यातून अवघ्या १० हजार रुपयांमध्ये राज्य संघटनांना या राष्ट्रीय पातळीवरच्या फेडरेशनची लाइफ टाइम मेंबरशिप मिळत आहे. याच खुल्या मार्केटमधून आतापर्यंत देशपातळीवर अनेक माेठ्या संख्येत राज्य संघटनांनी नाेंदणी केली आहे. यासाठी सध्या माेठी शर्यतच रंगली आहे.

संघटनांमध्ये दुफळी; वादाला सुरुवात : केंद्रीय मंत्रालयाने याेगाच्या प्रसार आणि प्रचाराच्या उद्देशाने खेळाचा दर्जा जाहीर केला. मात्र, याचा वेगळ्या पद्धतीने अर्थ लावत सध्या अनेक संघटनांनी आपली दावेदारी सादर केली. यातून आता प्रत्येक राज्यामध्ये चारपेक्षा अधिक स्टेट असाेसिएशनची नाेंदणी हाेत आहे. त्यामुळे प्रत्येक संघटना वर्चस्व व मान्यतेबाबतचा दावा करत आहे. याच वर्चस्वातून देशपातळीवर वादाला ताेंड फुटण्याचे चित्र आहे.

बाबा रामदेवचा ‘हटयाेग’; मार्गदर्शनाने फेडरेशनला मिळवून दिली मान्यता
गतवर्षी नॅशनल याेगासन स्पोर्ट्स फेडरेशनची स्थापना करण्यात आली आहे. दिल्ली येथील माेरारजी देसाई राष्ट्रीय याेग संस्थानचे संचालक डाॅ. ईश्वर बसवारेड्डी यांच्या नेतृत्वाखाली ही संघटना सक्रिय झालेली आहे. यासाठी पंतजली याेगपीठाचे जयदीप आर्या यांच्याकडे सचिवपदाची जबाबदारी साेपवण्यात आलेली आहे. त्यामुळे हे फेडरेशन सध्या झपाट्याने कार्य करत आहे. त्यामुळेच याच फेडरेशनला सध्या केंद्रीय क्रीडा मंंत्रालयाने मान्यता दिली. याच फेडरेशनने गतवर्षी आंतरराष्ट्रीय याेगासन महासंघाकडून मान्यता मिळवून घेतली. याच फेडरेशनमध्ये पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचे याेगगुरू नागेंद्र यांचाही समावेश आहे. याेगगुरू बाबा रामदेव यांच्या नेतृत्वाखाली हे फेडरेशन सध्या सक्रिय झालेले आहे. त्यांची या फेडरेशनच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. सध्या या महासंघाचे नामकरण वेगळे करण्यात आले आहे. याचे नाव वर्ल्ड याेगासन स्पाेर्ट््स फेडरेशन असे करण्यात आले आहे. कारण, आंतरराष्ट्रीय फेडरेशन या नावाची संघटना यापूर्वीच नाेंद आहे.

विदेशात याेगाला मागणी; काेट्यवधी रुपयांच्या कमाईसाठी कसरतीचे आसन
याेगाला गत पाच ते सहा वर्षांपासून आंतरराष्ट्रीय पातळीवर नवीन आेळख मिळाली आहे. पंतप्रधान माेदी यांनी याबाबत याेगा दिवस साजरा करण्याची घाेषणा केली. यातून आता याेगाचे महत्त्व जागतिक पातळीवर विस्तारले गेले. यातून आता विदेशातही यासाठीचे सेंटर सुरू करण्यात आले. विदेशातील नागरिकांनी याेगाला आत्मसात करण्याला पहिली पसंती दर्शवली आहे. त्यामुळे याठिकाणी आता माेठ्या संख्येंत याेगाचे प्रशिक्षण सेंटर सुरू करण्यावर अधिक भर दिला जात आहे. यातून फेडरेशनला आगामी काळात काेट्यवधी रुपयांची कमाई करता येणार आहे. याच कमाईसाठी चारही संघटनांनी आपले वर्चस्व असल्याचा दावा करत मान्यता असल्याचा बागुलबुवा केला आहे. त्यामुळे आता जागतिक पातळीवर कार्यरत असलेल्या चारपेक्षा अधिक फेडरेशननेही यासाठी आपली माेहीम सुरू केली आहे. मात्र, यासाठी सर्वच फेडरेशनला कसरतीचे आसन करावे लागत आहे. भारतामध्ये आपल्या फेडरेशनला अॅफिलेटेड राज्य संघटना माेठ्या संख्येत दाखवण्यासाठी स्वस्त दरात मेंबरशिप विकण्याचा बाजार मांडला. यासाठीची नाेंदणीही झपाट्याने सुरू आहे.

लखनऊ-कोलकातापासून सिंगापूरपर्यंत फेडरेशनचे नेटवर्क
योगाच्या एका राष्ट्रीय फेडरेशनची (नॅशनल याेगा फेडरेशन आॅफ इंडिया) तीन वर्षांपूर्वी स्थापना करण्यात आली. याचे कार्यालय लखनऊ येथे आहे. त्यामुळे ही फेडरेशन २०१७ पासून कार्यरत आहे. या फेडरेशनला सध्या आंतरराष्ट्रीय याेगा कमिटीची मान्यता आहे. या कमिटीची नाेंद २०१६ मध्ये करण्यात आली. याच्या अध्यक्षपदी प्रा. डॉ. मो. सिराज अन्सारी आहेत. तसेच महासचिव डाॅ. थियागू नागराज यांची निवड झालेली आहे. यांच्या माध्यमातून ही मान्यता बहाल करण्यात आली.

याेगाच्या चार संघटना कार्यरत; एकालाही आयआेसीची मान्यता नाही
योगा स्पोर्ट््सच्या चारपेक्षा अधिक संघटना सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्यरत आहेत. मात्र, यातील एकाही महासंघाला अद्याप इंटरनॅशनल आॅलिम्पिक असाेासिएशनची मान्यता नाही. त्यामुळे आपल्याला मान्यता असल्याचा दावा करत प्रत्येक महासंघ सध्या जाेमाने काम करत आहे. यामध्ये इंटरनॅशनल योग कमिटी, इंटरनॅशनल योग फेडरेशन, इंटरनॅशनल योगासन स्पाेर्ट््स फेडरेशन (दिल्ली) व इंटरनॅशनल याेगासन स्पाेर्ट््स फेडरेशनचा (सिंगापूर) समावेश आहे.


Back to top button
Don`t copy text!