राजकारण बाजूला ठेवून जावली गावात वृक्षलागवड व संवर्धनाच्या कामाला लागुया : श्रीमंत संजीवराजे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०७ मे २०२२ । जावली । राजकुमार गोफणे । जावलीच्या राजकारणात टोकाचे वाद कोणाचे नाहीत. राजकारण बाजूला ठेवून ग्रामपंचायत सोसायटी न करता सर्वांनी कामाला लागुया आणी वृक्ष वृक्षलागवड व संवर्धनाच्या योजना प्रभावी पणे राबवुया असे आवाहन श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँकेचे चेअरमन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले.

फलटण तालुक्यातील जावली येथे झालेल्या कार्यक्रमात श्रीमंत संजीवराजे बोलत होते. यावेळी जावलीच्या सरपंच सौ. ज्ञानेश्वरी मकर, उपसरपंच दादासाहेब ठोंबरे, पाणी फौंडेशनचे अजित पवार, किशोर इंगवले, डाॅ. संतोष भोसले, डाॅ. विवेक भोईटे, जेष्ठ मार्गदर्शक प्रा. सुधीर इंगळे, गोविंद मिल्कचे महाव्यवस्थापक डाॅ. शांताराम गायकवाड, कुरोली फुड्सचे संचालक रामदास कदम, तुकाराम बरकडे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिवसेंदिवस वाढत असलेल्या तापमान कमी करण्यासाठी वृक्षारोपण करण्याच्या सूचना शासनाकडे केल्या आहे. पर्यावरणाचा ह्रास रोखला पाहिजे. प्रत्येकाने मनावर घेवून वृक्षलागवड व संवर्धनाचे काम केले पाहिजे, असेही श्रीमंत संजीवराजे यांनी यावेळी स्पष्ट केले.

यावेळी माण तालुक्यातील राबविण्यात आलेल्या पाणी फौंडेशन योजना त्याबरोबरच कांदा पिकाचे विक्रमी उत्पादन कसे घ्यायचे याविषयी अजित पवार यांनी तर वृक्षारोपण व पाणी आडवुन पाणी पातळी वाढविण्याविषयी किशोर इंगवले यांनी सविस्तर माहिती उपस्थित ग्रामस्थांना दिली.

यावेळी प्रास्ताविकात जेष्ठ मार्गदर्शक प्रा. सुधीर इंगळे यांनी सॅटेलाईट रोटरी क्लब फलटण, कृषी विज्ञान केंद्र बारामती यांनी जावली गावाच्या बाजूचा १५०० एकराचा डोंगर वृक्षलागवड करून हिरवागार करणे उद्देश असल्याचे सांगून आगामी ७ जून पासून झाडे लावण्यास प्रारंभ होणार असल्याचे स्पष्ट केले.

यावेळी आरटीओ ज्योती पडर, एमपीएससी उत्तीर्ण श्रध्दा निंबाळकर, सेवानिवृत्त आरोग्य परिचर शांताबाई किरवे, सोसायटी विजयी संचालक ज्ञानदेव बरकडे, ग्रामपंचायत सरपंच सौ. ज्ञानेश्वरी मकर, उपसरपंच दादासाहेब ठोंबरे व सदस्य यांचा सत्कार श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळेस शास्त्रज्ञ संग्राम चव्हाण, कृषी पर्यवेक्षक डी. एम. एकळ, दत्तात्रय राऊत, कृषी सहाय्यक सतिश हिप्परकर, ग्रामसेवक दादासाहेब खाडे, विक्रम निंबाळकर, ॲड. अभिजित मोहिते, डॉ. महेश बर्वे, शंभुराज पाटील, प्रताप मोरे, किसनराव मोरे, आनंदराव निंबाळकर, सयाजी बरकडे, महादेव बरकडे, पोलिस पाटिल भरत मोरे, दादा नाळे, मोहन नाळे, अंकुश बाबर, सुनिता बाबर, सुरेखा बुधावले आदींसह ग्रामस्थ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!