स्थैर्य, कोळकी, दि. ७ : गेली अनेक वर्षे कोळकीची ग्रामपंचायत ताब्यात असूनही विकासकामांचा तोच अजेंडा सत्ताधारी पुन्हा-पुन्हा दाखवत असतील तर इतकी वर्षे त्यांनी काय केले? त्यामुळे अशाप्रकारे सत्तेसाठी भूलथापा मारणार्यां नेत्यांना घरी बसवा व विकासाचा नवा विचार मांडणार्या आणि जनतेसाठी 24 तास कर्तवदक्षपणे काम करणार्या उमेदवारांच्या पाठीशी रहावे, असे आवाहन कोळकीतील प्रभाग 3 चे भाजपचे अधिकृत उमेदवार धर्मराज देशपांडे यांनी केलेले आहे.
कोळकीचा मतदारराजा आता भूलथापांना बळी नाही पडणार नाही. मुळात ही लढाई कोणाला पराभूत करण्यासाठी नाही तर फक्त गावच्या विकासाची लढाई आहे. त्यामुळे उमेदवार किती पैसेवाला आहे हे न पाहता तो गावासाठी काय करू शकतो, हे पाहून मतदान करावे, असे आवाहन देशपांडे यांनी केलेले आहे.
गावासाठी खेळाची मैदाने असावी, खिळ बसलेल्या विकासकामांना पुन्हा चालना द्यावी, यासाठी आता सामाजिक बदलाची गरज आहे. अनेक वर्षे सत्तेवर वेटोळे घालून बसलेल्यांऐवजी तरुण उमेदवारच गावाला पुढे नेवू शकतात. मतांसाठी भूलथापा मारून वेळ मारून नेणारा नेता नव्हे तर 24 तास जनतेसाठी उपलब्ध होणारा कार्यकर्ताच हवा, असे मत देशपांडे यांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान, धर्मराज देशपांडे हे सुशिक्षित युवक आहेत. स्वच्छ चरित्र, विश्वासपात्र, निर्व्यसनी, कर्तव्यदक्ष, अभ्यासू, नम्र, सामान्यांची जाण, उत्कृष्ठ संघटन कौशल्य, विकासकामांची दूरदृष्टी, वेळ पडल्यास स्वखर्चातून विकासकामे करण्याची तयारी, संपूर्ण प्रभागात सर्वांशी सलोख्याचे संंबंध, तरुणांना सोबत घेवून व ज्येष्ठांचा आशीर्वाद घेवून काम करण्याची वृत्ती ही देशपांडे यांची जमेची बाजू आहे. त्याचप्रमाणे कोळकी ग्रामपंचायत ही नगरपंचायत करण्यासाठी देशपांडे हे पुढाकार घेणार आहेत. मुंबईत व्यवसायात त्यांनी उज्ज्वल यश मिळवले आहे. त्यामुळे गावात नवे उद्योग आणून युवा पिढीला कायम स्वरुपी रोजगार पुरवण्याची त्यांच्याकडे दृष्टी आहे. धर्मराज देशपांडे लोकांचा विश्वास सार्थ ठरवतील, असे गावातील जाणते लोकही खात्रीपूर्वक म्हणू लागले आहेत.