कराडच्या पाचपुतेवाडीत पुणे डीआरआयकडून छापेमारी

रेकॉर्डवरील संशयितासह तीनजण ताब्यात


स्थैर्य, 25 जानेवारी, सातारा : पाचपुतेवाडी, कराड येथील पत्र्याच्या शेडमधील पोल्ट्री फार्मवर डीआरआयकडून शनिवारी रात्री छापा टाकून सील करण्यात आले. या छाप्यात कोट्यवधी रूपये किंमतीचे ड्रग्ज जप्त केले. याप्रकरणी रेकॉर्डवरील संशयितासह तिघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडे कसून तपास केला जात आहे. मात्र, या कारवाईबाबत ‘डीआरआय’ विभागाकडून कमालीची गोपनीयता पाळली जात आहे. कराड दक्षिणेतील तुळसण गावापासून काही अंतरावर असलेल्या पाचुपतेवाडीत निर्जनस्थळी पोल्ट्री फार्म आहे. ही कारवाई एनडीपीएस कायद्यानुसार करण्यात आल्याने ड्रग्जवर कारवाई झाल्याची चर्चा आहे. सातारा जिल्ह्यात महिन्यात दुसरी कारवाई झाली आहे. डिसेंबरमध्ये मुंबई पोलिसांनी सावरी गावात छापेमारी करत ड्रग्ज जप्त केले होते.

कराड तालुक्यातील पाचुपतेवाडी येथे पुण्याच्या डीआरआय विभागाने मोठी कारवाई केली आहे. ही कारवाई एनडीपीएस कायद्यानुसार करण्यात आल्याने ड्रग्जवर कारवाई झाल्याची चर्चा आहे. डीआरआय विभागाच्या पथकाने एक शेड सील केले असून या शेडमध्ये अंमली पदार्थांची निर्मिती केली जात असल्याची माहिती समोर येत आहे. या ठिकाणी अंमली पदार्थ तयार केलं जात असल्याची उलटसुलट चर्चा सातारा जिल्ह्यात सुरू आहे. त्यामुळे नक्की या ठिकाणी कोणते अंमली पदार्थ तयार केला जात होते आणि आणखी किती जणांना ताब्यात घेण्यात आले, याची माहिती समोर येऊ शकली नाही.


Back to top button
Don`t copy text!