दैनिक स्थैर्य । दि. ०३ जुलै २०२२ । फलटण । श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी फलटण मुक्कामी असताना सदरील पालखीचे माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व ॲड. सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सपत्नीक पुजन केले आहे.
यावेळी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्यावतीने यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व ॲड. सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे व वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.