स्थैर्य, गोखळी, दि. १९ : राष्ट्रीय सामाजिक एकात्मता अभियानातर्गत कर्मवीर व योगाचार्य डॉ. प्रल्हाद वडगांवकर झपाटलेला ओबीसी बलुतेदार ग्रंथाचे प्रकाशन जेष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांच्या शुभहस्ते दि. १४ फेब्रुवारी २०२१ रोजी सायंकाळी 5 वाजता उद्यान प्रसाद मंगल कार्यालय, पुणे येथे शानदारपणे संपन्न झाले.
या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून ओबीसी सेवा संघाचे अध्यक्ष प्रदीप ढोबळेजी तर प्रमुख पाहुणे म्हणून माहिती व जनसंपर्क विभागाचे पुणे विभागीय संचालक राजेंद्र सरग, ऑल इंडिया जैन समाजचे अध्यक्ष डॉ. अशोककुमार पगारीया, माजी न्यायमूर्ती मानधाता झोडगे, ओबीसी संघटना प्रमुख डॉ. पोपट कुंभार, मोहन देशमाने, प्रताप गुरव, लक्ष्मण सुपेकर, नंदकुमार गोसावी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे स्वागत डॉ. उज्वला गुळवणी तर सूत्रसंचालन सावित्रीबाई फुले विद्यापीठ चे डॉ. संदीप सांगळे यांनी केले. तर आभार संयोजक रघुनाथ ढोक यांनी मानले. मोलाचे सहकार्य शेखर बामणे, सेवा ट्रस्टचे सचिव सौ. शीला वडगावकर, रमेश कुलकर्णी, सुदाम धाडगे, श्रीकांत गुळवणी, कांचन कुलकर्णी व आकाश, क्षितिज ढोक यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने विविध ओबीसी संघटनेचे पदाधिकारी व बांधव उपस्थित होते.