राज्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा जनता दरबार दोन आठवड्यांसाठी स्थगित


स्थैर्य,मुंबई, दि.१९: राज्यात कोरोनाने डोके पुन्हा वर घेतले आहे. अनेक जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून भरवण्यात येणारा जनता दरबार पुढील दोन आठवड्यांसाठी स्थगित करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून याबाबत पक्षाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन माहिती देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सूचनेनुसार जनता दरबार दोन दिवसांसाठी स्थगित करण्यात येत असल्याचे ट्विटरवर सांगण्यात आले आहे.

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढताना दिसत आहे. अनेक राज्यात रुग्ण वाढत असून, अनेकांचा मृत्यूही झाला आहे. दरम्यान, मागील चोवीस तासात राष्ट्रवादीच्या तीन मोठ्या नेत्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. यामाध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि खान्देशातील राष्ट्रवादीचे बडे नेते एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने आपल्या सोशल मीडियावरुन जनता दरबार स्थगित करत असल्याची माहिती दिली आहे.


Back to top button
Don`t copy text!