अ‍ॅड.सौ.मधुबाला भोसले यांच्या हस्ते ‘लोकजागर’ दिवाळी अंकाचे प्रकाशन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. 13 नोव्हेंबर 2023 | फलटण | शहरी व ग्रामीण भागातील साहित्यिकांच्या कथा, कविता, लेख, व्यंगचित्रे आदी साहित्यकृतींनी नटलेल्या यंदाच्या 44 व्या ‘लोकजागर’ दिवाळी अंकाचे प्रकाशन स्वयंसिद्धा महिला संस्था समूहाच्या प्रमुख अ‍ॅड.सौ.मधुबाला भोसले यांच्या हस्ते येथील ‘लोकजागर’ कार्यालयात समारंभपूर्वक संपन्न झाले. यावेळी ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे, श्री सद्गुरु संस्था समुहाचे प्रमुख दिलीपसिंह भोसले, महाराजा मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडीट सोसायटीचे व्हाईस चेअरमन रणजितसिंह भोसले, ‘लोकजागर’चे संस्थापक रविंद्र बेडकिहाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमास महाराष्ट्र साहित्य परिषद, फलटण शाखेचे ज्येष्ठ मार्गदर्शक बापूसाहेब मोदी, प्राचार्य शांताराम आवटे, ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव, बापूराव जगताप, फलटण तालुका वारकरी संघटनेचे प्रमुख ह.भ.प.केशवराव जाधव महाराज, हिरालाल गांधी, महात्मा एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारिणी सदस्य रविंद्र बर्गे, सौ.स्वाती फुले, म.सा.प. फलटण शाखेचे कार्याध्यक्ष महादेवराव गुंजवटे, कार्यवाह ताराचंद्र आवळे, ज्येष्ठ साहित्यिक सुरेश शिंदे, सौ.सुलेखा शिंदे, जैन सोशल ग्रुपचे श्रीपाल जैन, मोडी लिपी वाचक व इतिहास अभ्यासक पांडुरंगदादा सुतार (कोरेगांव), सेवाभारती फिरती विज्ञान प्रयोगशाळा फलटण तालुका प्रमुख पोपटराव बर्गे, पत्रकार विशाल शहा, किरण बोळे, विक्रम चोरमले, प्रसन्न रुद्रभटे, सचिन मोरे, पोपटराव मिंड, सुभाषराव सोनवलकर, प्रदीप चव्हाण, प्रकाश सस्ते, ऋषिकेश आढाव, मितेश उर्फ काकासाहेब खराडे, निलेश सोनवलकर, श्रीकृष्ण सातव, योगेश गंगतीरे, उमेश दुबे (बारामती), लेखक गोपाळ सरक, वरदा आर्टस्चे महेश सुतार, यशवंत ऑफसेटचे महेश शिंदे, छायाचित्रकार बंडू चांगण, सागर ऑफसेटचे सागर मोहिते, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे विश्‍वस्त सुहास रत्नपारखी, आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक भिवा जगताप, अरुण खरात, श्रीराम विद्याभवनचे मुख्याध्यापक मनीष निंबाळकर, अशोक सस्ते, किशोर पवार, धर्मराज माने आदींची उपस्थिती होती.

रविंद्र बेडकिहाळ यांना लेखन कौशल्याची ईश्‍वराकडून देणगी : अ‍ॅड.सौ.मधुबाला भोसले

‘‘‘साहित्य’ विषयक अथवा लिखाणाचा प्रश्‍न निर्माण झाला की; आमच्यापुढे नेहमी पहिले नाव रविंद्र बेडकिहाळ यांचे येते. लेखन कौशल्याची ईश्‍वराची देणगी त्यांना लाभलेली आहे. त्यातूनच ‘लोकजागर’चा दिवाळी अंक दरवर्षी सातत्याने प्रकाशित होत आहे. त्यांच्या विविध उपक्रमांना घरातूनही खंबीर साथ लाभते हे महत्त्वाचे आहे’’, असे सांगून अ‍ॅड.सौ.मधुबाला भोसले यांनी ‘लोकजागर’च्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

‘लोकजागर’चा प्रवास चिकाटीमुळे शक्य : सुभाषराव शिंदे

‘‘44 वर्षे एखादे वृत्तपत्र सातत्याने चालविणे हे अतिशय अवघड काम आहे. ‘लोकजागर’ चे संस्थापक रविंद्र बेडकिहाळ यांच्या चिकाटीमुळे ते सहजशक्य झाले आहे. त्यांचे कार्य वृत्तपत्रापुरते मर्यादित नसून पत्रकारिता, साहित्यिक, राजकीय, सामाजिक, अध्यात्मिक अशा सर्वच क्षेत्राशी ते निगडीत आहेत. त्यांच्या या कार्याच्या पाठीशी आम्ही सदैव ठामपणे उभे आहोत’’, असे सांगून सुभाषराव शिंदे यांनी ‘लोकजागर’च्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

‘लोकजागर’चे स्वरुप दिवसेंदिवस आकर्षक : दिलीपसिंह भोसले

‘‘गेल्या 44 वर्षांपासून रविंद्र बेडकिहाळ यांच्या माध्यमातून ‘लोकजागर’शी माझा जिव्हाळ्याचा संबंध आहे. रविंद्र बेडकिहाळ यांच्या इच्छेतून, मार्गदर्शनातून आणि प्रयत्नातून आम्ही फलटण शहरात साहित्यिक, क्रिडा, सांस्कृतिक असे वेगवेगळे उपक्रम राबवत असतो. ‘लोकजागर’चं स्वरुप दिवसेंदिवस आकर्षक होत आहे. ते असेच विस्तारत जावो’’, अशा सदीच्छा दिलीपसिंह भोसले यांनी यावेळी व्यक्त केल्या.

‘लोकजागर’ची परंपरा प्रसारमाध्यम क्षेत्रासाठी आदशर्वत : प्रा.रमेश आढाव

‘‘‘लोकजागर’ महाराष्ट्रातील अनेक घरांमध्ये पोचलेला आहे. त्याचा प्रवास अतिशय जुना असून ही परंपरा जतन करण्याचे काम ‘लोकजागर’ परिवाराकडून अखंडपणे सुरु आहे. प्रसारमाध्यम क्षेत्रातील नवोदितांना हे काम आदर्शवत असे आहे.’’, असे मत ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांनी व्यक्त केले.

‘लोकजागर’कडून साहित्य चळवळ जोपासण्याचे काम : ह.भ.प. केशवराव जाधव महाराज

‘‘सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक, ऐतिहासिक, शैक्षणिक अशा सर्वच क्षेत्रामध्ये ‘लोकजागर’ परिवार कार्यरत असतो. समाजजागृतीसाठी आवश्यक असलेल्या साहित्य चळवळीला एक परंपरा आणि संस्कृती आहे. ती जोपासण्याचे काम ‘लोकजागर’च्या माध्यमातून सुरु आहे.’’, असे ह.भ.प.केशवराव जाधव महाराज यांनी सांगितले.

लोकजागर नेहमीच वाचनिय : सौ.सुलेखा शिंदे

आमच्या लेखनाला ‘लोकजागर’ ने नेहमीच प्रसिद्धी दिलेली आहे. ‘लोकजागर’ च्या दिवाळी अंकासोबतच नियमितपणे प्रकाशित होणारा साप्ताहिकाचा अंकही नेहमीच वाचनिय असतो. त्यात प्रसिद्ध झालेले लेखन मी संग्रही ठेवून इतरांनाही ते वाचण्यास आवर्जून देत असते, असे लेखिका सौ.सुलेखा शिंदे यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे आभार रणजितसिंह भोसले यांनी मानले.

प्रारंभी अ‍ॅड.सौ.मधुबाला भोसले यांचे स्वागत ‘लोकजागर’च्या व्यवस्थापकीय संपादक सौ.अलका बेडकिहाळ यांनी केले. सूत्रसंचालन व उपस्थित मान्यवरांचे स्वागत ‘लोकजागर’ परिवाराचे सदस्य अमर शेंडे, भारद्वाज बेडकिहाळ, संपादक रोहित वाकडे यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृष्णात बोबडे, संजय चोरमले, प्रदीप बोडरे यांनी परिश्रम घेतले.


Back to top button
Don`t copy text!