दैनिक स्थैर्य | दि. २ मे २०२३ | फलटण |
अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था केंद्र फलटणच्या वतीने सार्वजनिक व्रतबंध सोहळा धूमधडाक्यात व मोठ्या उत्साहात साजरा झाला. प्रतीवर्षीप्रमाणे यावर्षी सार्वजनिक व्रतबंध सोहळ्याचे आयोजन महाराजा मंगल कार्यालय येथे करण्यात आले होते. सार्वजनिक व्रतबंधाचा मूळ उद्देश ब्राह्मण समाजातील या कार्यक्रमास एकत्र सोहळा पार पाडताना आर्थिक भार विभागला जातो. यामध्ये माफक दरात सोयी सुविधा पुरवून मौजी बंधनाच्या सुसंस्कृतपणा व संस्कार शिस्तबद्ध व परिपूर्ण पणे पार पाडला जातो.
या सोहळ्यासाठी बारामती, नीरा, पाडेगाव, निढळ, वाठार निंबाळकर या भागातून सभासदांनी नाव नोंदवून सहभाग घेतला. वेदमूर्ती निरंजन क्षीरसागर व त्यांचे ब्रह्मवृंद यांनी पौरोहित्याची नियोजन उत्कृष्ट पद्धतीने केले.
दुपारी भिक्षावळीची, मुंजे व त्यांचे आप्तेष्ट यांचेसह सजलेल्या गाडीतून फटाक्याच्या आतषबाजीत मिरवणूक काढण्यात आली.
या सोहळ्यास ज्येष्ठ नेते श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व नगरसेवक किशोर नाईक निंबाळकर यांनी भेट देऊन कार्यक्रमाचे कौतुक केले.
केंद्रप्रमुख विजय ताथवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कार्यकारणी सदस्य व सभासद यांचे सहकार्य मिळाले. या कार्यक्रमास ५०० पेक्षा जास्त सभासद, निमंत्रित तसेच निरा, लोणंद येथील ब्राह्मण संघाचे केंद्रप्रमुख देखील उपस्थित होते.