दैनिक स्थैर्य | दि. २४ मार्च २०२४ | फलटण |
भारत निवडणूक आयोगामार्फत मतदारांमध्ये मतदानाबाबत जनजागृतीचे विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. या जनजागृतीच्या माध्यमातून मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी sveep अंतर्गत काम सुरू आहे.
सहायक निवडणूक निर्णय अधिकारी फलटण सचिन ढोले, तहसीलदार फलटण डॉ. अभिजित जाधव, श्री. एस. के. कुंभार सहायक गट विकास अधिकारी फलटण यांच्या मार्गदर्शन खाली (sveep) अंतर्गत मतदारांमध्ये मतदानाबाबत जनजागृती होत आहे.
४३ माढा लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अनुषंगाने दिनांक २३ मार्च २०२४ रोजी फलटण शहरातील सौ. वेणूताई चव्हाण फार्मसी कॉलेज फलटण येथे (sveep) अंतर्गत मतदारांमध्ये मतदानाबाबत जनजागृती कार्यकम घेण्यात आला. यावेळी मतदारांनी मोठया संख्येने मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर जाऊन हक्क बजवावा तसेच ‘मतदारराजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो’ या घोषणा देण्यात आल्या. वोटर हेल्पलाईन अॅपबाबत माहिती तसेच दिव्यांग मतदारांसाठी सोयीसुविधांची माहिती श्री. सचिन जाधव स्वीप सहायक अधिकारी फलटण यांनी दिले.
यावेळी नवमतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्याची शपथ घेतली. तसेच मतदान जनजागृतीपर व्याख्यान यावेळी घेण्यात आले. स्वीप सहायक पथप्रमुख शहाजी शिंदे तसेच नवमतदार व शिक्षक आणि स्वीप टीम यावेळी उपस्थित होते.