फलटणच्या पिरॅमिड चौक ईशान्य बझार येथे मतदानाबाबत जनजागृती

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २३ एप्रिल २०२४ | फलटण |
भारत निवडणूक आयोगामार्फत मतदारांमध्ये मतदानाबाबत जनजागृतीच्या विविध कार्यक्रमांमार्फत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी स्वीपअंतर्गत काम सुरू आहे.
फलटणचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले, तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव, श्री. एस. के. कुंभार सहाय्यक गटविकास अधिकारी, स्वीप पथकप्रमुख शहाजी शिंदे, पूजा दुदुस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीपअंतर्गत मतदारांमध्ये मतदानाबाबत जनजागृतीचे हे काम सुरू असून पिरॅमिड चौक, ईशान्य बझार येथे मतदार जागृती करण्यात आली.

यावेळी मतदारांमध्ये मतदान करण्याबाबतचे संकल्पपत्र याची माहिती देऊन मतदारांनी मतदान करण्याबाबत ‘संकल्प आमचा १०० टक्के मतदानाचे’ पत्र भरून दिले. दि. ७ मे २०२४ रोजी आपला मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन स्वीप सहाय्यक सचिन जाधव यांनी केले व मतदारांची मतदान करण्याबाबत प्रतिज्ञा घेण्यात आली.

यावेळी संगिनी फोरमच्या अध्यक्षा सौ. अपर्णा जैन, सौ. नीना कोठारी, पौर्णिमा शहा, सौ. प्रज्ञा दोशी, सौ. मनीषा घडिया, श्रीपाल जैन, श्रेयांश जैन, संगिनी सदस्या तसेच इतर महिला मतदार उपस्थित होत्या.


Back to top button
Don`t copy text!