औंध जिल्हा परिषद गटातील रस्त्यासाठी 61.55 कोटीची तरतूद:- गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, औंध, दि.10: औंध जिल्हा परिषद गटातील विकासाच्या वाहिन्या असलेले रस्ते दर्जेदार व्हावे यासाठी जाहीर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्या माध्यमातून आणि पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या सहकार्याने सुमारे 61.55 कोटींचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
प्रसिद्धिस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की
रस्ते लोकांच्या जिव्हाळा दळणवळणाचे मुख्य साधन आहे. औंध जिल्हा परिषद गटातील रस्त्यांची अतिशय दुरावस्था झाली होती. यासाठी आम्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे  रस्त्यासाठी निधीची मागणी केली होती. खटाव तालुक्यातील जनतेच्या मागणीला महाविकास आघाडी सरकारने सकारात्मक प्रतिसाद देऊन औंध जिल्हा परिषद गटातील खालील रस्त्यांच्या  आणि पूलाच्या  कामासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे. अर्थसंकल्पात मंजूर झालेला निधी पुढील प्रमाणे
औंध चौकाची सुधारणा करणे-95 लक्ष, भुरकवडी- कुरोली- वरुड- औंध रस्ता रुंदीकरणासह सुधारणा करणे व आर.सी.सी गटर बांधणे- 13 .10 कोटी , पळशी- भूषणगड- निमसोड रस्ता आर.सी.सी गटरसह बांधणे 9.5 कोटी, नागाचे कुमठे ते औंध- गोपूज रस्ता रुंदीकरणासह सुधारणा करणे 6. 5 कोटी, वडूज -कराड ते गुरसाळे रस्ता रुंदीकरणासह सुधारणा करणे 5 कोटी, गुरसाळे ते अंबवडे रस्ता रुंदीकरणासह सुधारणा करणे 5 कोटी , अंभेरीघाट ते कोकराळे चौकीचा आंबा रस्ता रुंदीकरणासह सुधारणा करणे 5 कोटी , वडूज नढवळ रस्ता रुंदीकरणासह सुधारणा करणे 5 कोटी, नढवळ ते निमसोड रस्ता रुंदीकरणासह सुधारणा करणे 5.50 कोटी, विटा- महाबळेश्वर राज्यमार्गावरील वडी येथे अंडरपास पूल बांधणे 6 कोटी निधी मंजूर करण्यात आल्याचे गायत्रीदेवी यांनी पत्रकात म्हटले आहे.
विकासाचा वसा सोडणार नाही
औंध जिल्हा परिषद गटातील जनतेने नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पाठराखण केली आहे. त्यामुळे येथील जनतेला दिलेल्या शब्दाची पूर्तता करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून आणखी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल.
 – गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी औंध

Back to top button
Don`t copy text!