सातारा सैनिक स्कूलच्या विकासासाठी राज्याच्या अर्थ संकल्पात तरदूत 300 कोटी तरतूद

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि.१८: सातारा येथील सैनिक स्कूल कै. यशवंतराव चव्हाण यांच्या प्रयत्नातून उभे राहिले आहे. या सैनिक स्कूलच्या विकास कामांसाठी राज्य शासनाने 300 कोटींची तरतूद केली आहे. या सैनिक स्कूलचा टप्या टप्याने विकास करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री यांनी आज सैनिक स्कूलच्या पाहणी दरम्यान सांगितले.

या पाहणी प्रसंगी जिल्हाधिकारी शेखर सिंह, सातारा जिल्हा अधिक्षक अभियंता संजयकुमार मुनगीलवार प्रांताधिकारी मिनाज मुल्ला,तहसीलदार आशा होळकर, कार्यकारी अभियंता एस.पी. दराडे ,सातारा सैनिक स्कूलचे प्राचार्य उज्वल घोरमाडे, उपप्राचार्य बी. लक्ष्मीकांत, प्रशासकीय अधिकारी प्रमोद पाटील, सातारा सैनिक स्कूलचे माजी विद्यार्थी अमर जाधव आदी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, सैनिक स्कूलची स्थापना 1961 साली झाली आहे. या शाळेचा परिसर 115 एकर असून या शाळेत 630 विद्यार्थी शिकत आहे. या सैनिक स्कूलमधील काही इमारती 1932 व 1962 या वर्षातील आहे. त्या आता जुन्या झाल्या आहेत. राज्य शासनाने सैनिक स्कूलच्या विकासासाठी 300 कोटींची अर्थसंकल्पीय तरतूद केली आहे. या सैनिक स्कूलच्या विकासासाठी आराखडा तयार करण्यात येणार असून टप्याटप्याने विकासासाठी निधी उपलब्ध होणार आहे. त्या कामाला आता गती दयावी अशा सूचना पालकमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या.

यावेळी पालकमंत्री यांनी एनडीए ब्लॉक, कर्मचाऱ्यांची निवासस्थाने, डहाणूकर हॉल, कॅटींन , शाळेची मुख्य इमारतीबारोबर सैनिक स्कूलच्या मैदानाची पहाणी केली. त्यावेळी त्यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचनाही केल्या.


Back to top button
Don`t copy text!