प्रधानमंत्री आवास योजना यशस्वीरित्या राबविण्यासाठी प्रांताधिकारी सचिन ढोले ऑन फिल्ड

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १८ जुलै २०२३ । फलटण ।

सध्या फलटण उपविभागात प्रधानमंत्री आवास योजना यशस्वीरित्या राबवण्यासाठी फलटणचे उपविभागीय अधिकारी तालुक्यातील प्रमुख अधिकाऱ्यांच्यासह ऑन फिल्ड काम करत आहेत.

प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत ज्या अर्जदारांना शासकीय जागा उपलब्ध करून द्यायची आहे; त्यासाठी प्रांताधिकारी सचिन ढोले हे फलटण तालुक्यातील प्रमुख अधिकार्यांच्यासह भूमी अभिलेख कार्यालयात दाखल झाले आहेत. यावेळी तहसीलदार अभिजित जाधव, मुख्याधिकारी संजय गायकवाड, पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी कुंभार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी फलटण तालुक्यातील 56 अर्जदारांच्या प्रलंबित कामासाठी प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी भूमी अभिलेख कार्यालयात समक्ष जाऊन आढावा घेतला. त्यामध्ये टाकळवाडे येथील 21, राजुरी येथील 4, राजुरी येथील 7, हनुमंतवाडी येथील 3, पिंप्रद येथील 5, हनुमंतवाडी येथील 8 व जिंती येथील 8 असे अर्ज प्रलंबित होते.


Back to top button
Don`t copy text!