दैनिक स्थैर्य | दि. १ सप्टेंबर २०२३ | फलटण |
फलटण तालुक्यातील लम्पी आजारावर उपाययोजना आणि उपचार याबाबत आज पशूवैद्यक अधिकार्यांची बैठक फलटणचे उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी बोलविली होती.
फलटण तालुयात सध्या ५ गोवंश जनावरे लम्पी आजाराने बाधित आहेत. लम्पी आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी शेतकर्यांना त्वरित प्रतिसाद देणे, औषधांचा साठा उपलब्ध करणे आणि लसीकरण १०० टक्के पूर्ण करणे ही उद्दिष्टे आज झालेल्या बैठकीत निर्धारीत करण्यात आली, अशी माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली.