दैनिक स्थैर्य । दि. 01 डिसेंबर 2021 । फलटण । फलटण शहरामध्ये गेल्या अनेक महिन्यापासून फलटणकरांना दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे फलटण मधील नागरिकांना विविध साथीच्या आजारांचे सामोरे जावे लागलेले आहे. यामुळेच फलटण नगरपालिकेतील नागरिकांना दूषित पाणी सर्वपक्षीय नेतेमंडळीच्या वतीने देण्यात आलेले आहे. आगामी आठ दिवसामध्ये जर सुरळीत पाणी पुरवठा करण्यात आला नाही, तर सर्वपक्षीय नेतेमंडळी आंदोलन छेडू असा इशारा सुद्धा यावेळी पालिका अधिकाऱ्यांना देण्यात आला.
संपूर्ण फलटण शहरामध्ये गेल्या तीन महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर दूषित पाणीपुरवठा वारंवार होत आहे. यापूर्वी अनेकदा तोंडी, लेखी निवेदन देवून सुद्धा नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी हे दुर्लक्ष करीत आहेत. पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी पालिकेने कोट्यवधी रुपये खर्च झालेले आहेत. तरीसुद्धा पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. या सर्व बाबींचा विचार करून काँग्रेसचे कार्याध्यक्ष अमीर शेख यांनी दूषित पाणी भेट देऊन आंदोलन छेडणार होते परंतु पोलीस प्रशाशनाच्या विनंतीस मान देऊन आंदोलन स्थगित करून सर्वपक्षीय नेतेमंडळींनी दूषित पाणी भेट दिलेले आहे. आगामी आठ दिवसामध्ये जर सुरळीत पाणीपुरवठा झाला नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडू, असा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला.
यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र बेडके, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, कार्याध्यक्ष आमिरभाई शेख, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अजिंक्य कदम, शहराध्यक्ष प्रीतम जगदाळे, भाजपा शहराध्यक्ष अमोल सस्ते, नगरसेवक अशोकराव जाधव, सचिन अहिवळे, शिवसेना तालुकाप्रमुख स्वप्नील मुळीक, शहरप्रमुख रणजित कदम, आझाद समाज पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सनी काकडे, उपाध्यक्ष मंगेश आवळे, जिल्हा उपाध्यक्ष सूरज भैलुमे, मनसे जिल्हा उपाध्यक्ष युवराज शिंदे, रिपब्लिकन पक्ष तालुकाध्यक्ष संजय गायकवाड, उपाध्यक्ष रमेश चव्हाण, सिद्धार्थ दैठणकर, ताजुद्दीन बागवान, अल्ताप पठाण, अशोक शिंदे, अमोल काळे, अजित मोरे, राहुल पवार, लक्ष्मण शिंदे, विजयकुमार भोसले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.