स्थैर्य, फलटण, दि. २९ : मुळीकवाडी घाडगेवाडी परिसरामध्ये काल रात्री सुरुंग स्फोटाच्या झालेल्या नुकसानामुळे घरांचे तातडीने पंचनामे करून त्यांना तातडीने मदत करण्यात यावी, असे निर्देश फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार दीपक चव्हाण यांनी आज पाहणी दरम्यान दिलेले आहेत.
आमदार दीपक चव्हाण यांनी आज सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या समवेत सुरुंग स्फोटामुळे घाडगेवाडी मुळीकवाडी येथे झालेल्या नुकसानाची पाहणी केली यावेळी फलटणचे तहसीलदार समीर यादव, जिल्हा परिषद सदस्य धैर्यशील (दत्ता) अनपट यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.
घाडगेवाडी मुळीकवाडी परिसरांमध्ये काल रात्री स्टोन क्रेशर साठी ब्लास्ट करत असताना तेथील कामगाराच्या चुकीमुळे तेव्हा ब्लास्ट मोठ्या प्रमाणात होऊन घाडगेवाडी मुळिकवाडी येथील बहुतांश घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. तेथील स्टोन क्रेशर व नियमितपणे ब्लास्टिंग सुरू असते परंतु काही कारणास्तव त्या ब्लास्टिंग चुकल्यामुळे घाडगेवाडी व मुळीकवाडी या परिसराला सुरूंगाचा जोरदार धक्का बसला आहे.
याबाबत खाणीच्या मालकाबरोबर चर्चा सुरू असून संबंधित खाण मालक हा सदरील घरांची नुकसान भरपाई भरून देण्सास अनुकुल दिसत आहे. जरी समंधिताने नुकसान भरपाई दिली नाही तरी शासन स्तरावर योग्य ती कार्यवाही करून नुकसान ग्रस्तांना नुकसान भरपाई दिली जाईल, अशी खात्री तहसिलदार समीर यादव यांनी दिली.