फलटणमध्ये डेंग्यूमुळे निधन झालेल्या किरण काकडे यांच्या कुटुंबींयाना आर्थिक मदत करा; फलटणमध्ये मोर्चा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २६ सप्टेंबर २०२२ । फलटण । फलटणमधील किरण काकडे ह्या तरुणाचे डेंग्यूमुळे निधन झालेले आहे. त्याच्या कुटुंबियांची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. या सर्व गोष्टींचा विचार करता सदरील कुटुंबीयांना फलटण नगर परिषदेच्या माध्यमातून जास्तीत जास्त आर्थिक मदत करण्यात यावी. त्यासोबतच त्याच्या आईला फलटण नगर परिषदेमध्ये कंत्राटी कामगार म्हणून तरी कामावर रुजू करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.

किरण काकडे यांच्या निधनाबद्दल त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्यात यावी म्हणून फलटण नगर परिषदेवर मोर्चा काढण्यात आलेला होता. डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती व सर्व आंबेडकरी संघटनेच्या वतीने मोर्चा आयोजित करण्यात आला होता. यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती २०२२ चे अध्यक्ष ॲड. अनिकेत अहिवळे, माजी नगरसेवक सनी अहिवळे, सचिन अहिवळे, सनी काकडे, शाम अहिवळे, मंगेश आवळे, महादेव गायकवाड (आप्पा), विकी काकडे, प्रतीक गायकवाड, अमर झेंडे, सागर सोरटे, सुरज भैलुमे यांच्या सह शेकडो भिमसैनिक, माता व बघिनी उपस्थित होत्या.

सध्याच्या काळामध्ये फलटण शहरांमध्ये डेंग्यूचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले दिसत आहे. तरी फलटण नगरपरिषदेने डेंग्यू बाबत कडक भूमिका घेऊन फलटण शहरांमधून डेंग्यूला हद्दपार करावे. यासोबतच फलटण शहरातील नामवंत असलेल्या डॉक्टरांनी डेंग्यू बाबत जनजागृती करून डेंग्यूचे पेशंट जरी सिरीयस असले तरी त्यांना तातडीने उपचार द्यावेत, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.


Back to top button
Don`t copy text!