कराडमध्ये कर्नाटक सरकारविरोधात निदर्शने

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, कराड, दि. ११ : बेळगावातील मनगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यात आला. या घटनेबद्दल संताप व्यक्त करत कराड येथे शिवसेना व संभाजी ब्रिगेडच्यावतीने कर्नाटक सरकार विरोधात  निदर्शने करत या घटनेचा निषेध करण्यात आला. येथील दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या-समोर शिवसैनिकांनी मनगुत्ती येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा हटवल्याबद्दल कर्नाटक सरकारचा निषेध करत कर्नाटक सरकार व मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्रासह देशाचे आराध्यदैवत आहेत. कर्नाटक सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवणे ही संतापजनक बाब आहे. सदरचा पुतळा त्या जागी पुन्हा बसवावा, अशी मागणी शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी केली.

यावेळी सातारा उपजिल्हा प्रमुख रामभाऊ रैनाक, कराड दक्षिण प्रमुख दिलीप यादव, कराड शहराध्यक्ष शशिराज करपे, अक्षय गवळी, साजिद मुजावर, सूर्यकांत मानकर व अजित पुरोहित आदी शिवसैनिक उपस्थित होते.

संभाजी ब्रिगेडच्यावतीनेही मनगुत्ती येथील या घटनेचा निषेध करण्यात आला. यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या पोस्टरचे दहन संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांच्यावतीने करण्यात आले व कर्नाटक सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. हटवण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्वरित तेथे बसवावा. अन्यथा या घटनेचे पडसाद महाराष्ट्रासह कर्नाटकातही उमटल्याशिवाय राहणार नाहीत, अशा इशारा संभाजी ब्रिगेडच्यावतीने देण्यात आला.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!