फरांडवाडीत ‘जयमल्हार लॉज’वर वेश्याव्यवसाय; तिघांवर कारवाई, एका महिलेची सुटका

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २७ जानेवारी २०२५ | फलटण |
उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण राहुल धस यांनी २५ जानेवारी २०२५ रोजी दुपारी १.५० वाजण्याच्या सुमारास फरांदवाडी (ता. फलटण) गावच्या हद्दीत ‘जयमल्हार लॉज’वर छापा टाकून वेश्याव्यवसाय करणार्‍या तिघांवर कारवाई करत एका महिलेची सुटका केली आहे.

प्रविण रंगराव पवार (वय ३५, रा. विडणी, ता. फलटण, जि. सातारा, दीपक दत्तात्रय धायगुडे (वय २८, रा. सरडे, ता. फलटण, जि. सातारा व राहुल सूर्यकांत सरगर (वय ५०, रा. मलटण, ता. फलटण) यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली. यातील प्रवीण पवार आणि दीपक धायगुडे यांना पोलिसांनी अटक केली असून राहुल सरगर फरारी आहे.

या आरोपींकडून पोलिसांनी १,२६,५००/- रुपये किमतीचा माल हस्तगत केला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी, कर्मचारी व येथील निर्भया पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे. त्यामध्ये स.पो.फौ. अहिवळे, पोना शेख, पो.कॉ. लवटे, मपोकॉ तळपे, पो. हवा. भोसले, पोकॉ पवार, पोकॉ काकडे, चापोकॉ नाळे व मपोकॉ वलेकर यांचा समावेश आहे.

यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण राहुल धस यांनी सर्व पालकांना आवाहन केले आहे की, त्यांनी आपल्या पाल्यांचेवर लक्ष ठेवून ते नक्की काय करतात, याबाबत दक्षता घ्यावी. अशाप्रकारचे कोणी अवैध धंदे फलटण तालुक्यात व उपविभागात करीत असतील तर त्याबाबतची माहिती तात्काळ देणेत यावी. असे धंदे करणार्‍यांवर ठोस कारवाई केली जाईल. कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असे त्यांनी सांगितले आहे.


Back to top button
Don`t copy text!