दैनिक स्थैर्य । दि. ०३ जानेवारी २०२३ । सातारा । महिलांनी उच्च तंत्रज्ञान व उच्च शिक्षण घेतल्याशिवाय भारत बलशाली होऊ शकत नाही. सावित्रीबाई फुले यांचे विचार आज तंतोतंत लागू होते. याची मुहूर्तमेढ एक जानेवारी 1848 रोजी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी पुणे येथे भिडे वाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली. एक स्त्री शिकली तर अवघे कुटुंब शहाणे होते हे फुले दाम्पत्याने 1 74 वर्षापूर्वी ओळखले होते. असे प्रतिपादन छत्रपती शिवाजी कॉलेजच्या मराठी विभागाच्या सहाय्यक प्रा. डॉ. विद्या नावडकर यांनी केले.रयत शिक्षण संस्थेच्या महाराष्ट्रातील पहिले अनुदानित कॉलेज व कर्मवीर समाधी परिसर या ऐतिहासिक भूमित सावित्रीबाईंना
अभिवादन करण्यात आले. आज अफगाणिस्तानमधील तालिबान राजवट असल्याने तेथे मुलींना उच्च शिक्षण त्याचबरोबर माध्यमिक शिक्षणात यावर बंदी घातली आहे. सावित्रीबाई फुले यांच्या काळात सुद्धा चित्र फारसे वेगळे नव्हते पण क्रांतिकारी व बंडखोरी व अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद असलेल्या महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी प्रतिगामी विचारांच्या विरोधात जाऊन सर्व समाज शिक्षित झाला पाहिजे, ज्ञानाधिष्ठित झालं पाहिजे हे ओळखून मुलींसाठी स्वतंत्र शाळा सुरू करण्याचे ठरविले समाजाच्या अवहेलना सहन कराव्या लागल्या समाजकंटकांनी अंगावर चिखल, शेण टाकला स्वतःचे नातेवाईक यांनी सुद्धा बहिष्कृत केले पण कुठलीही तमा न बाळगता समाजाच्या आणि राष्ट्राच्या उत्थानासाठी फुले दाम्पत्याने आजीवन स्वतःला वाहून घेतले. आज मुलांच्या तुलनेत मुली जास्त
कुपोषित आहेत 2011 च्या जनगणनेनुसार मुलींचे प्रमाण 48.5 टक्के आहे. देशाच्या क्रयशक्ती मुद्दे महिलांचा वाटा 29 टक्के आहे विधीमंडळात व संसदेत सुद्धा महिला राजकारणात फारसे सक्रिय नाहीत असे दिसून आलेले आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने आजही आर्थिक, सामाजिक, व राजकीय स्वातंत्र्य मिळाले असे चित्र पाहायला मिळत नाही.
सावित्रीबाई फुले यांच्या 192 व्या जयंतीनिमित्त खऱ्या अर्थाने महिलांना आर्थिक, राजकीय, सामाजिक स्वातंत्र्य प्रदान करायचे असल्यास
त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्या त्यांची क्रयशक्ती वाढविण्यासाठी त्यांना उच्च दर्जाचे तंत्रज्ञानयुक्त रोजगाराभिमुख,
व्यवसायाभिमुख शिक्षण प्रदान करायला हवे. महात्मा फुलेंचा व सावित्रीबाईंचा वसा आणि वारसा जपण्याचे काम कार्य कार्य कर्मवीर भाऊराव पाटील रयत माउली सौ लक्ष्मीबाई यांनी केले महिलांच्या शिक्षणाची गरज ओळखून 1960 मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब
आंबेडकर यांच्या मातोश्री यांच्या स्मरणार्थ भीमाबाई आंबेडकर कन्या विद्यालयाची स्थापना केली, 1942 मध्ये आप्पासाहेब पाटील यांच्या विवाहाचा खर्च कमी करून व आलेल्या भेटवस्तू व सर्व पैसे विकून जिजामाता अध्यापिका विद्यालयाची स्थापना केली. खऱ्या अर्थाने सावित्रीबाईंचा वारसा कर्मवीर, रयत माऊली यांनी आजीवन जपला. रयत शिक्षण संस्थेमध्ये विदर्भ व मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलींसाठी तसेच आर्थिक दुर्बल घटकातील अनेक मुलींसाठी संस्थेच्या खर्चाने ज्ञानाचे धडे घेत आहेत. रयत
शिक्षण संस्थेमध्ये महिलांनी शिक्षण घ्यावी यासाठी संगणक शिक्षण, महिलांसाठी मिलिटरी ऍकॅडमी सुरू करण्यात आली.
सावित्रीबाईंचे कार्य निरंतर प्रज्वलित रहावे, त्यांच्या कार्याचे स्मरण रहावे यासाठी मान्यवरांसह कर्मवीर समाधी परिसरात भावी शिक्षकांनी प्रा. प्रदीप हिवरकर लिखित प्रतिज्ञा घेतली…
मी सावित्रीची लेक म्हणून माझ्या देशासाठी न्याय, स्वातंत्र, समता, बंधुता या लोकशाही मूल्यांचे आजीवन व्रत करेल शिकलेला समाज आदेशाचा मजबूत पाया असतो. समाजाला घातक असलेल्या अज्ञान, अंधश्रद्धा, दैववाद, जातीयवाद यांना बाजूला सारून वैज्ञानिक भाव निर्माण करण्यासाठी कटिबद्ध राहील. समाजातील उपेक्षित, वंचित घटकाच्या उत्थानासाठी आजीवन कार्य करील. जगाला सामर्थ्यशाली बनवायचे असेल तर प्रथम स्वतःला सबल व सक्षम असले पाहिजे याची मला जाणीव आहे म्हणून आयुष्याच्या शेवटपर्यंत नित्य नव-नवीन ज्ञान, कौशल्य, तंत्रज्ञान आत्मसात करेल व आर्थिक सामाजिक, राजकीय, स्वातंत्र्य निर्माण करण्यासाठी जाणीवपूर्वक व प्रयत्नपूर्वक आजीवन कार्यरत राहील.
जय सावित्रीबाई सावित्रीबाई यांना अभिवादन करत असताना अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य उदयकुमार सांगळे यांनी महिला सक्षमीकरण व सबलीकरणासाठी केंद्र व राज्य स्तरावर अनेक योजना कार्यरत आहेत त्यांचा महिलांनी सूक्ष्मपणे अभ्यास करून आपल्या व्यवसाय वृद्धीसाठी व कौशल्यवृद्धीसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत असे प्रतिपादन केले. सावित्रीबाईंना अभिवादन करत असताना प्रमुख पाहुणे प्रा. विद्या नावडकर यांच्या हस्ते सावित्रीमाईंच्या स्मरणार्थ वृक्षाचे रोपण करण्यात आले. सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.प्रदीप हिवरकर यांनी आयोजित केलेल्या भित्तीपत्रक, पोस्टर स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले. यामध्ये पोस्टर स्पर्धेत विजेते प्रथम क्रमांक गायकवाड आदेश द्वितीय क्रमांक बेलोशे मृदुला व तृतीय क्रमांक प्रसाद वाडकर यांना प्रमाणपत्र, गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी ओरसे सोनाली व योगिता गोळे, देवयानी जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. देवयानी जाधव हिने कार्यक्रमाचे कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. दादासाहेब नवले यांनी केले. याप्रसंगी प्रा. रवींद्र घाटगे, प्रा.सोमनाथ शिंगाडे, प्रा.ज्योती शिंदे व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार ढाणे तनुजा यांनी मानले.