स्थैर्य, फलटण : सातारा जिल्ह्यातील फलटण पोलीस उपविभागाच्या अंतर्गत येणाऱ्या विविध प्रलंबित कामे त्वरित मार्गी लावावीत असे निर्देश विधानपरिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आयोजित आढावा बैठकीदरम्यान दिले.
सातारा जिल्हा पोलीसदला अंतर्गत येणाऱ्या फलटण पोलीस उपविभागाच्या विविध प्रलंबित कामांसाठी विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन येथे आढावा बैठक आयोजित करण्यात आलेली होती. गृहमंत्री अनिल देशमुख, आमदार शशिकांत शिंदे यांची या बैठकीला प्रमुख उपस्थिती होती. यांच्यासमवेत गृह विभागातील उच्चपदस्थ अधिकारी सदरील बैठकीला उपस्थित होते.
फलटण पोलीस उपविभागातील विविध कामे प्रलंबित असून ती कामे तातडीने मार्गी लावावीत असे निर्देश सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आगामी काळात तातडिने फलटण पोलीस उपविभागातील सर्वच्या सर्व प्रलंबित कामे मार्गी लागतील असे आश्वासन या वेळी दिले.