औंध पोलीस स्टेशनच्या दोन कर्मचाऱ्यांना बढती


स्थैर्य, औंध,दि.३: जिल्हा पोलीसप्रमुख यांच्या आदेशाने औंध ता खटाव येथील पोलीस स्टेशनच्या दोन कर्मचाऱ्यांना नुकतीच पदोन्नती देण्यात आली आहे.

खुल्या प्रवर्गातून सेवाज्येष्ठता नुसार पोलीस हवालदार प्रकाश यादव यांना सहाय्यक फौजदार म्हणून आणि पोलीस नाईक प्रशांत पाटील यांना पोलीस हवालदार म्हणून त्यांनी आतापर्यंत केलेल्या सेवेतील उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन बढती देण्यात आली आहे. त्यांना पदोन्नती मिळाल्याबद्दल जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्सल उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ निलेश देशमुख, सपोनि उत्तमराव भापकर पोलीस कर्मचारी ,औंध ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.


Back to top button
Don`t copy text!