संभाजी गावडेंची प्रादेशिक परिवहन अधिकारी (वर्ग १) पदी पदोन्नती


दैनिक स्थैर्य | दि. 15 ऑक्टोबर 2024 | फलटण | तालुक्यातील गुणवरे गावाचे सुपुत्र संभाजी गावडे यांची प्रादेशिक परिवहन अधिकारी (वर्ग १) पदी पदोन्नती झाली असून निवडीबद्दल त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

संभाजी गावडे हे सध्या सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांची जाण असलेले अधिकारी म्हणून संभाजी गावडे यांची ओळख आहे. गुणवरे गावात इंग्लिश माध्यमाचे शिक्षण संकुल उभारून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना माफक फी मध्ये शिक्षणाचे दार उघडणारे अशी ख्याती असणारे संभाजी ईश्वर गावडे मोठ्या पदावर विराजमान झाल्याने गुणवरेकरांचा आनंद द्विगुणीत झाला आहे.


Back to top button
Don`t copy text!