मतदानाच्या दिवशी मतदान कल चाचणीस प्रतिबंध


दैनिक स्थैर्य । दि. ०२ नोव्हेंबर २०२२ । मुंबई ।  भारत निवडणूक आयोगाने १६६- अंधेरी (पूर्व) या महाराष्ट्र विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक घोषित केली केली आहे. या निवडणुकीकरिता दिनांक ३ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे.

या मतदानाच्या दिवशी म्हणजेच दिनांक ३ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ७ ते संध्याकाळी ६.३० या कालावधीत मतदान कल चाचणी (EXIT POLL) घेण्यास तसेच EXIT POLL चे निकाल प्रिंट तसेच इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांवर किंवा अन्य माध्यमांद्वारे प्रसिद्ध करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे, असे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी कळविले आहे.


Back to top button
Don`t copy text!