‘प्रोग्रेसिव्ह’ हे संस्कारक्षम पिढी घडविणारे आदर्श ज्ञानमंदिर : प्रा. श्री रविंद्र कोकरे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०४ मार्च २०२२ । कोळकी । प्रोग्रेसिव्ह संस्कारक्षम पिढी घडविणारे आदर्श ज्ञानमंदिर असल्याचे गौरवोद्वार सुप्रसिद्ध ग्रामीण कथाकथनकार प्रा. श्री. रविंद्र कोकरे यांना ‘मराठी राजभाषा दिनी’ सरस्वती शिक्षण संस्था संचलित प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे मराठी राजभाषा दिन व विज्ञान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम मान्यवरांचे स्वागत विद्यार्थ्यांनी केले. त्यानंतर ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविवर्य कुसुमाग्रज व भारतीय शास्त्रज्ञ सी. व्ही. रमन यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख पाहुण्यांनी केले. विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचे महत्व, कुसुमाग्रज यांचा जीवन परिचय, विज्ञान दिन महत्व तसेच संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा जीवन परिचय, इ. विषयांवर अतिशय सुंदर भाषणे केली. त्यानंतर इ. ९ वी च्या विद्यार्थ्यांनी समूहगीत सादर केले तसेच विद्यार्थ्यांनी काव्यवाचन, भारुड, अभंग इ. चे उत्तम सादरीकरण केले. तसेच इ. १ ली ते ८ वी च्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राची लोकधारा हे नृत्य सादरीकरणाद्वारे महाराष्ट्रातील भुपाळीपासून ते विविध संस्कृतीचे दर्शन घडवले तसेच विद्यार्थिनीने ताटी उघडा ज्ञानेश्वरा हा एकपात्री नाट्यप्रयोगही सादर केला अशाप्रकारे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील चैतन्य व उत्साह निश्चितच वाखाणण्याजोगी होता. यानंतर प्रमुख पाहुणे म्हणून श्री. कोकरे सर यांनी मनोगत व्यक्त करताना शाळेमध्ये राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांचे कौतुक केले. प्रोग्रेसिव्हच्या माध्यमातून मराठी मातीशी जोडलेली विद्यार्थ्यांची नाळ परदेशात शिक्षणासाठी गेल्यावर ही अतूट राहील असा आशावाद व्यक्त केला व शिक्षकांचे अभिनंदन केले तसेच विद्यार्थ्यांचे आपल्या खास विनोदी शैलीतून मनोरंजन केले व छोट्या छोट्या गोष्टी व मुल्ये पटवून दिली. इंग्रजी माध्यमाची शाळा असून ही मराठी राजभाषा दिन साजरा केल्याचे विशेष कौतुक केले. याप्रसंगी संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका सौ. संध्या गायकवाड, संस्थेचे सचिव विशाल पवार, संचालिका प्रियांका पवार यांच्यासह प्राचार्या सौ. सुमन मखवाना, समन्वयिका सौ. अहिल्या कवितके पर्यवेक्षक श्री. अमित सस्ते मराठी विभाग प्रमुख आशादेवी भराडे विज्ञान प्रमुख मंगेश देशपांडे यांच्यासह सर्व शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. याप्रसंगी मराठी व विज्ञान विषय शिक्षकांचा विशेष सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन कु. आदिती गवारी, सार्थक सोनवलकर, कु. अंतरा ढालपे व कु. समिक्षा माने या विद्यार्थिनी केले व आभार कु. समरा तांबोळी हिने मानले.


Back to top button
Don`t copy text!