प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल व ज्युनिअर कॉलेजचा एसएससी परीक्षेत पहिल्याच वर्षी १००% निकाल मिळवून संपूर्ण तालुक्यात दैदिप्यमान नावलौकिक

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परिक्षेचा निकाल बुधवार, दि.२९ जुलै २०२० रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन पध्दतीने जाहीर झाला. यात असंख्य विद्यार्थी-विद्यार्थिनींनी भरघोस यश प्राप्त केले. असेच भरघोस यश सरस्वती शिक्षण संस्थेच्या प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी यांना प्राप्त झाले. शैक्षणिक वर्ष २०१९- २०२० पासून इयत्ता दहावीची मान्यता प्राप्त झालेल्या या स्कूलने आपल्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा कायम ठेवत पहिल्याच वर्षी १००% निकाल मिळवून संपूर्ण तालुक्यात दैदिप्यमान असा नावलौकिक प्राप्त केला आहे.

अशा भरघोस यशाच्या शिखरावर स्कूलला नेण्याचे श्रेय हे स्कूलच्या कमिटीस निश्चितच जाते. संस्थेचे संस्थापक भीमराव माने, संस्थेचे अध्यक्ष प्रदीप माने, संस्थेचे सचिव विशाल पवार, संस्थेचे मार्गदर्शक पांडुरंग पवार, संस्थेच्या कोषाध्यक्ष सौ. सविता माने, संस्थेच्या संचालिका सौ. प्रियांका पवार, निवृत्त केंद्रप्रमुख व समाजसेवक सुभेदार डूबल तसेच व्यवस्थापकीय संचालिका सौ.संध्या गायकवाड यांच्यासह प्राचार्या सौ.सुजाता गायकवाड या सर्वांचे विशेष अभिनंदन विद्यार्थी-विद्यार्थिनींनी व पालकांच्या वतीने करण्यात आले. 

तसेच या १००% यशस्वी निकालात जे विद्यार्थी-विद्यार्थिनींनी चांगल्या मार्कांनी पास झाले त्यांचेही अभिनंदन संस्थेच्या वतीने करण्यात आले. 

अमित सस्ते, सौ. अहिल्या कवितके, श्रीमती आशा भराडे, मंगेश देशपांडे, सौ. तेजश्री पिसाळ, सौ. पूनम तावरे यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनींनी यांना मार्गदर्शन व कौशल्याने घडविले अशा सर्व कुशल शिक्षकवृंदाचे सुद्धा अभिनंदन संस्थेच्या वतीने करण्यात आले.

सध्याची परिस्थिती व सामाजिक बांधिलकी जपता स्कूल कमिटी व शिक्षकांनी फोन करून यशस्वी विद्यार्थी व विद्यार्थिनींना अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या व घेतल्या. स्कूल कमिटीने मार्गदर्शक शिक्षकांचा यथोचीत सन्मान केला. यशस्वी विद्यार्थी विद्यार्थींनींच्या शैक्षणिक भविष्याचा पुढील विचार करता प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल व ज्युनिअर कॉलजने शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ करिता XI सायन्स व XI कॉमर्स (इंग्रजी माध्यम) या दोन्ही शाखांसाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू केलेली आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!