दैनिक स्थैर्य | दि. ३० मे २०२४ | फलटण |
सरस्वती शिक्षण संस्था संचलित प्रोग्रेसीव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, कोळकी (फलटण) या शाळेने इयत्ता १० वीच्या १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे.
शाळेचे कु. राज जयवंत कर्वे ९५.८०% गुण, कु. चैतन्य जगदिश यादव ९३.८०%, कु. आर्यन सचिन वांभुरे ९३.६०%, कु. शिवराज संदिप मुळीक ९३.००%, कु. रितु गणेश तुपे ९३.००%, कु. श्रेया आप्पा सोनवलकर ९३.००% गुण मिळवून प्रथम पाचमध्ये आले व कु. समीक्षा गणेश माने ९२.६०%, कु. मृण्मयी सुभाष जाधव ९१.८०%, कु. निशांत सचिन रणवरे ९१.६०%, कु. अंतरा शशिकांत ढालपे ९१.४०%, कु. यशराज सतिश जमदाडे ९०.४०%, कु.साईश सतिश फरांदे ९०.२०% या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुण मिळवले आहेत. तसेच या परीक्षेसाठी ३५ विद्यार्थांनी उत्कृष्ट गुण मिळवून १००% निकालाची परंपरा सलग पाचव्या वर्षीही कायम राखली आहे.
या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक शिक्षक श्री. अमित सस्ते, श्री. महेंद्र कातुरे, श्री. ज्ञानेश्वर जाधव, श्री. विजय मदने, श्री. इरफान शेख, श्रीमती आशादेवी भराडे, सौ. सुजाता गायकवाड, सौ.प्राजक्ता हावळ यांचे मार्गदर्शक लाभले.
याबद्दल सरस्वती शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रदीप माने, सरस्वती शिक्षण संस्थेच्या कोषाध्यक्षा सौ. सविता माने, सरस्वती शिक्षण संस्थेचे सचिव श्री. विशाल पवार, सरस्वती शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका सौ. संध्या गायकवाड, प्राचार्य श्री. अमित सस्ते, पर्यवेक्षिका सौ. माधुरी माने, समन्वयिका सौ. सुवर्णा निकम व योगिता सस्ते तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक व अभिनंदन केले.