सज्जनगड येथील बुरुजाची स्वच्छता मोहिमेचा कार्यक्रम

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. ०९ : आपण लहान असताना दिवाळी आली, की आपल्या दारात किल्ले बनवायचो. आपला किल्ला इतरांपेक्षा कसा उठावदार, वेगळा आणि सुटसुटीत असावा यासाठी जीव की प्राण करायचो; परंतु आता परिस्थिती थोडी वेगळी आहे. बहुतांश गड-किल्लेहे दुरवस्थेत दिसून येत आहेत. त्यामुळे परळी खोर्‍यातील मावळ्यांनी सज्जनगड येथील बुरुजाची स्वच्छता मोहिमेचा कार्यक्रम आखला.

जवळपास 50 मावळ्यांनी सज्जनगड येथील बुरुजाची तसेच आसपासच्या परिसराची स्वच्छता मोहीम फत्ते केली. ह्या दिवाळीत छोटे गड, किल्ले तयार करण्याबरोबरच आपल्या आसपासच्या ऐतिहासिक गड, किल्ल्यांचा संवर्धनाचा संदेश या माध्यमातून परळी खोर्‍यातील या पन्नास मावळ्यांनी दिला आहे. यावेळी पावसाळ्यात आलेल्या बुरुजाशेजारील गवताची स्वच्छता तसेच बुरुजावर असलेल्या झाडांमुळे बुरूज कमकुवत होत असल्याने तिही झाडे तोडण्यात आली. सह्याद्रिच्या पर्वत रांगेत खूप किल्ले आहेत. या गडांना छ. शिवरायांचा पदस्पर्श लाभला आहे. या किल्ल्यांचे संवर्धन, जतन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. यापुढेही अशीच दुर्ग संवर्धन मोहीम आखून गडाना सुशोभित करण्यात येईल असा निर्धार संयोजकांनी व्यक्त केला. अतिवृष्टीने बुरूज ढासळला या गोष्टीला दोन वर्षे झाली. पण काहीच हालचाल नाही. बुरूज, तटबंदी गडाचे वैभव असते. ते सुशोभित असलेच पाहिजे. त्याची निगा राखली पाहिजे. दुसर्‍याकडे बोट दाखवण्या अगोदर आपणच सुरुवात केली पाहिजे. गड, तट त्या वरील गवत झाडे, झाडांची मुळे यामुळे तटबंदी ढासळते. ते स्वछ करण्याचा आम्ही सर्व प्रयत्न करतो आहे. हे काम असेच वृद्धिंगत राहण्यासाठी सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकानी केले आहे. दुर्ग संवर्धन मोहिमेत सुमारे पन्नास मावळे होते. ही संख्या वाढली पाहिजे. आपल्या गडांचे वैभव आपण वाढवले पाहिजे, असे बोलताना दुर्ग संवर्धकांनी सांगितले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!