प्रा. सुषमा जाधव यांना पीएच. डी. प्रदान

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २ ऑक्टोबर २०२३ | बारामती |
तुळजाराम चतुरचंद कनिष्ठ महाविद्यालयातील मराठी विभागाच्या प्रा. सुषमा जाधव यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांनी नुकतीच कलाशाखाअंतर्गत मराठी विषयाची पीएच. डी. पदवी प्रदान केली आहे. त्यांच्या पीएच.डी. संशोधन प्रबंधाचा विषय ”आनंदीबाई शिर्के यांच्या समग्र साहित्याचा अभ्यास ” हा होता.

या शोधकार्यासाठी त्यांना कला महाविद्यालय भिगवण, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव वाळुंज यांनी मार्गदर्शन केले. आनंदीबाई शिर्के यांनी केलेले लेखन शंभर वर्षापूर्वीचे होते, या संशोधन प्रबंधाच्या माध्यमातून दुर्लक्षित लेखिकेला प्रकाशात आणले.

या शैक्षणिक कार्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष जवाहर शाह (वाघोलीकर), सचिव मिलिंद शाह (वाघोलीकर), महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश जगताप, उपप्राचार्य डॉ. सचिन गाडेकर, उपप्राचार्य डॉ. अशोक काळंगे, रजिस्ट्रार अभिनंदन शहा, कनिष्ठ विभागातील उपप्राचार्या वैशाली माळी, विज्ञान शाखेचे समन्वयक प्रा. गोरखनाथ मोरे, कला व वाणिज्य शाखेचे समन्वयक प्रा. संजय शेंडे, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी त्यांचे सदर संशोधन कार्याबद्दल अभिनंदन केले.


Back to top button
Don`t copy text!