प्रा. सोनाली भिसे यांना महाराष्ट्र रत्न पुरस्कार प्रदान


दैनिक स्थैर्य । 29 मे 2025। फलटण । येथील शिरभावी स्वरूपा करियर अकॅडमी फलटण संचालिका सौ सोनाली सुरज भिसे यांना टॅलेंट कट्टा या संस्थेकडून आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र रत्न पुरस्कार वितरण सोहळ्यात देण्यात येणारा यावर्षीचा राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न पुरस्कार 2025 पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे.

सौ. सोनाली भिसे सैन्य भरती प्रशिक्षण, शैक्षणिक, सामाजिक व इतर क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल हा पुरस्कार जाहीर झाला आहे या पुरस्काराबाबतची माहिती डॉ. दिपक जाधव यांच्या कडून निवड पत्राद्वारे देण्यात आली आहे. महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त भारत सरकार सूक्ष्म लघु एव, मध्यम उद्योग मंत्रालय या विभागात नोंदणीकृत असलेल्या टॅलेंट कट्टा या संस्थेकडून महाराष्ट्ररत्न पुरस्कार वितरण नुकतेच पुणे येथे करण्यात आले.

या सोहळ्यात साहित्य, कला, सामाजिक, क्रिडा, सांस्कृतिक, उद्योग, पर्यटन, अपंग निराधार महिला, वन्यजीव, व्यवसाय, शैक्षणिक, आरोग्य, सार्वजनिक सेवा, स्वायत्त संस्था, सहकार, पत्रकारिता, कृषी अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणार्‍या सन्मानित करण्यात आले आहे. या सोहळ्यात सुप्रसिध्द अभिनेत्री आर्या घारे, नितिन धवने पाटील यांच्या व मान्यवरांच्या हस्ते मानपत्र, मानचिन्ह, शाल, फेटा देऊन सन्मानित करण्यात आले..

स्वरूपा करियर अकॅडमीच्या माध्यमातून त्यांनी स्पर्धा परीक्षा कौशल्य विकास व सैन्य व पोलीस भरतीचे प्रशिक्षण विषयक मोफत मार्गदर्शन केले आहे. तसेच अनेक विद्यार्थ्यांना योग्य प्रकारे नवीन संधी दिलली आहे. यासाठी त्यांचे पती सुरज भिसे यांची मोलाची साथ त्यांना लाभलेली आहे तसेच अनेक गरीब व गरजू मुलांनाही त्यांनी मोफत प्रशिक्षण दिले आहे या पुरस्काराबद्दल त्यांचे विविध मान्यवर, नातेवाईक, मित्रमंडळींना अभिनंदन केले आहे.


Back to top button
Don`t copy text!