निंभोरे येथील शिवतेज तरुण मंडळाच्या गणपतीची प्रा. रमेश आढाव यांच्या हस्ते आरती

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १६ सप्टेंबर २०२४ | फलटण |
निंभोरे येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवतेज तरुण मंडळाच्या गणपती बाप्पांची आरती तसेच फूड फेस्टिवलचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक रमेश आढाव, पत्रकार युवराज पवार, पत्रकार प्रसन्न रुद्रभट्टे, पत्रकार योगेश गंगतीरी, पत्रकार काकासाहेब खराडे, पत्रकार वैभव जगताप, पत्रकार प्रशांत रणवरे, पत्रकार ऋषी आढाव यांच्या हस्ते संपन्न झाला.

यावेळी मान्यवरांचा सत्कार मंडळाचे पदाधिकारी यांनी केला. फूड फेस्टिवलमध्ये अनेक महिलांनी सहभाग घेतला होता आणि प्रत्येकाने वेगळे पदार्थ खूप आकर्षक आणि चविष्ट असे बनवून आणले होते. निंभोरे आणि निंभोरे पंचक्रोशीतील सर्व खवय्यांनी तसेच ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी प्रचंड प्रतिसाद मिळाला.

यावेळी अभिजीत रणवरे, संजोग रणवरे, वैभव रणवरे, शिवाजीराव जाधव, मुकूंद नाना रणवरे, योगेश रणवरे, अनंत रणवरे, रणजीत निंबाळकर, प्रवीण रणवरे, बाळू काका रणवरे, रामदास अडसूळ, ओंकार रणवरे तसेच शिवतेज तरुण मंडळ, श्री संत सावता माळी तरुण मंडळ, जय मल्हार तरुण मंडळ, भैरवनाथ गणेशोत्सव मंडळ, नवयुग तरुण मंडळ, या मंडळाचे सर्व सभासद तसेच निंभोरे पंचक्रोशीतील ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

यावेळी अमित रणवरे यांनी स्वागत केले. हभप सुशांत रणवरे यांनी प्रस्ताविक केले. ज्या महिलांनी फूड स्टॉलमध्ये सहभाग घेतला होता त्या सर्व महिलांना वै. पोपटराव नरसिंगराव रणवरे(बाप्पू) यांच्या स्मरणार्थ मंडळाचे अध्यक्ष अमित रणवरे यांच्या वतीने पंढरपूर-तुळजापूर आणि अक्कलकोट या तीर्थक्षेत्र ठिकाणी मोफत तीर्थक्षेत्र यात्रा केली जाणार असल्याचे जाहीर केले. तसेच मंडळाची संपूर्ण वाटचाल तसेच सर्व कार्यक्रमांची रुपरेषा सांगितली. पत्रकार बांधवांच्या वतीने पत्रकार प्रा. रमेश आढाव सर यांनी शिवतेज तरुण मंडळाच्या कार्याचे कौतुक करून निंभोरे गावच्या सर्व मंडळांच्या तसेच ग्रामस्थांचा एकोपा हा एक आदर्श आहे आणि खूप कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार काढून मंडळास पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


Back to top button
Don`t copy text!