दैनिक स्थैर्य | दि. ५ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित मुधोजी महाविद्यालयाच्या इतिहास विभागातील प्रा. डॉ. सौ. योगिता रविंद्र मठपती यांना टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची नुकतीच विद्यावाचसप्ती (पीएच.डी.) ही पदवी प्राप्त झाली.
पुणे इतिहास विभागाच्या डॉ. सौ. स्वराली कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आपले संशोधनाचे काम पूर्ण केले आहे. त्यांनी “ए स्टडी ऑफ पॉलिटिकल, सोशल अॅण्ड कल्चरल कॉन्ट्रीब्युशन ऑफ द फलटण सिटी (१८१८-१९४७)” या विषयावर संशोधन केलेले आहे.
याबद्दल त्यांचे फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, सोसायटीच्या गव्हर्निंग कौन्सिलचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सोसायटीचे सचिव श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, उपाध्यक्ष प्राचार्य विश्वासराव देशमुख, प्रशासन अधिकारी प्राचार्य अरविंद निकम या सर्वांनी अभिनंदन व कौतुक केले. त्याचबरोबर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी एच. कदम, उपप्राचार्य डॉ. एस. जी. दीक्षित, माजी इतिहास विभागप्रमुख कै. प्रा. डॉ. एस. एम. गावडे यांनी विशेष सहकार्य केले व मार्गदर्शन केले.
इतिहास विभागातील सहकारी प्राध्यापक व इतिहास विभागप्रमुख प्रा. डॉ. ए. एस. टिके यांनी संशोधन करीत असताना मार्गदर्शन व सहकार्य केले. तसेच विविध स्तरातील मान्यवरांनी प्रा. डॉ. योगिता मठपती यांचे अभिनंदन केले.