दैनिक स्थैर्य | दि. ५ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
फलटण-बारामती मार्ग आणि पालखी महामार्ग यांचे सर्व अधिकारी, कंत्राटदार, एनएच पीडब्ल्यूडी यांचे अधिकारी तसेच रेल्वे अधिकारी यांची आज आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत या महिनाअखेर रेल्वे भूसंपादन पूर्ण करणे तसेच पालखी महामार्ग काम वेगाने पूर्ण करून येत्या आषाढीची पायी वारी संपूर्णपणे नवीन महामार्गावरून होईल, याबाबत निर्देश देण्यात आले.
फलटणचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी प्रांताधिकारी कार्यालयात राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकार्यांची व ठेकेदारांची संयुक्त बैठक आयोजित केलेली होती. यामध्ये वरीलप्रमाणे निर्देश प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिले आहेत.
या बैठकीत फलटण-बारामती महामार्गही येत्या वर्षभरात पूर्ण करून द्यावा, याबाबत गाववार येणार्या अडचणी तपासून घेण्यात येतील, असे सांगण्यात आले. तसेच रेल्वे प्रकल्प, पालखी महामार्ग आणि संभाव्य एमआयडीसी या चार महत्त्वपूर्ण प्रकल्पांवर लक्ष देण्यात येईल, असे प्रांताधिकार्यांनी सांगितले.