दैनिक स्थैर्य । दि. २८ नोव्हेंबर २०२२ । सोलापूर । अरण्यऋषी मारुती चित्तमपल्ली यांनी संकल्पित भव्य स्वरूपातील सार्वजनिक वाचनालयाची उद्घोषणा केली. निमित्त होते, अक्कलकोट रोड वरील हेरिटेज मणीधारी येथील ते वास्तव्यास असलेल्या संकुलामध्ये पार पडलेल्या वृत्तपत्र वाचनालय कक्षाच्या उद्घाटनाचे आदर्श ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी मंडळाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. “नव्या पिढीला उपयुक्त व मार्गदर्शक ठरणाऱ्या बहुमोल ग्रंथांचे हे एक सुसज्ज दालन असेल” असेही ते म्हणाले.
यावेळी उद्घाटक म्हणून बोलताना आमदार प्रणितीताई शिंदे म्हणाल्या, “माहिती – ज्ञान – वाचनसंस्कृतीच्या वाढीचे सर्वोत्तम माध्यम म्हणून अशा उपक्रमाचे आपण मनापासून स्वागत केले पाहिजे.” सिद्धेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष धर्मराज कडादी यांनी आपल्या भाषणात उपक्रमाचे कौतुक करून या व अशा अनेकविध गोष्टींकरिता हवे ते सहकार्य करण्याचे अभिवचन दिले.
प्रारंभी विश्वस्त अध्यक्ष विजयकुमार भोसले यांनी प्रास्ताविक केले.
प्रभागातील नगरसेवक राजकुमार हंचाटे, पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी, संजय जोगीपेटकर, सचिन क्षीरसागर, अंबादास खराडे यांनीही सबोधित केले.मंचावर सुधाकर नराल, राजू हिबारे, निशांत अंबरशेट्टी, मलप्पा मुळजे याचीही उपस्थिती होती.
कार्याध्यक्ष दौलतराव भैरामडगी, संघटक हनुमंतु गजेली, कार्यवाह शिवाजीराव क्षीरसागर, निमंत्रक सिद्धाप्पा गोविंदे, कोषाध्यक्ष श्रीनिवास चित्तमपल्ली, नारायणसा बुरबुरे, कल्याणराव आळंद, रमेश नंदूर, विश्वनाथ काळे, शाम गांगजी, अशोक दंडी, मल्लिकार्जुन गोरंटी, सतीश नोमुल, शंकर गाडी यांनी विशेष परिश्रम घेतले.
सिद्धेश्वर श्रीगादी यांनी आभार मानले, शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.