दैनिक स्थैर्य । दि. ०६ सप्टेंबर २०२२ । फलटण । तालुक्यातील भाडळी गावचे सुपुत्र व इंदापूर तालुका ग्राम विकास प्रतिष्ठानचे विश्वासराव रणसिंग महाविद्यालय,कळंब ता. इंदापूरचे मानसशास्त्र विभाग प्रमुख प्रा.राजेंद्रकुमार नरसिंग डांगे यांना “ज्ञान, कला, क्रीडा व कृषी प्रतिष्ठान, फडतरे नॉलेज सिटी” कळंब-वालचंदनगर ता. इंदापूर जि. पुणे या संस्थेच्या वतीने “५ सप्टेंबर शिक्षक दिनाच्या”औचित्याने दिला जाणारा प्रतिष्ठेचा”आदर्श शिक्षक पुरस्कार २०२२” देऊन सन्मानित करण्यात आले. सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप होते.
शिक्षण क्षेत्रात नाविन्यपुर्ण उपक्रम राबवून उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल हा पुरस्कार संस्थेच्या वतीने दरवर्षी दिला जातो.”फडतरे नॉलेज सिटी”चे संस्थापक अध्यक्ष तथा उद्योजक उत्तमराव फडतरे यांच्या शुभहस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत संस्थेच्या सभागृहात हा पुरस्कार देण्यात आला.
यानंतर प्रा. राजेंद्रकुमार डांगे यांच्या “आजची शिक्षणव्यवस्था” या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांच्या या सन्मानाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच सहकारी शिक्षक वृंद आणि फडतरे नॉलेज सिटी चे पदाधिकारी शिक्षक वृंद सहकारी यांच्यासह ग्रामपंचायत भाडळी बु.,मातोश्री विकास सेवा सोसायटी भाडळी बु, जाणता राजा प्रतिष्ठान, नेहरु युवा मंडळ भाडळी बु. आणि समस्त ग्रामस्थ भाडळी बु.यांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले.