आमच्या मुलीचा मृतदेह आम्हाला न विचारता पेट्रोल टाकून का जाळला? प्रियंका गांधींनी पीडित कुटुंबियांच्या वतीने भाजप सरकारला विचारले हे ‘पाच’ सवाल

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, नवी दिल्ली, दि.४: उत्तर प्रदेशातील हाथरस येथे झालेल्या सामूहिक बलात्कार आणि हत्या या प्रकरणानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. तसेच मुलीचा रातोरात केलेला अंत्यविधी, कुटुंबियांवर आणला जाणार दबाव अशा अनेक गोष्टींमुळे योगी सरकारवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आता या प्रकरणी काँग्रेसच्या सरचिटणीस यांनी पीडितेच्या कुटुंबीयांच्या वतीने पाच प्रश्न मोदी सरकारला केले आहेत.

हाथरस पीडितेच्या कुटुंबाचे प्रश्न :-

सुप्रीम कोर्टच्या माध्यमातून संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे.

हाथरसच्या डीएमला सस्पेंड करण्यात यावे आणि कोणत्याही मोठे पद दिले जाऊ नये

आमच्या मुलीचा मृतदेह आम्हाला न विचारता पेट्रोलने का जाळला?

आमची वारंवार दिशाभूल का केली जाते आहे? आम्हाला का धमकावले जातेय?

आम्ही माणुसकीच्या नात्याने चितेवरचे फूल निवडूण आले आहेत, पण आम्ही कसे मान्य करावे की तो मृतदेह आमच्याच मुलीचा होता?

प्रियंका गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून हे सवाल उपस्थित केले आहेत. तसेच या सर्व प्रश्नांची उत्तर जाणून घेणे पीडित मुलीच्या कुटुंबियांचा हक्क असल्याचेही प्रियंका म्हणाल्या आहेत. काल प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांनी पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली. मोठ्या गदारोळानंतर त्यांना हाथरस येथे जाण्याची परवानगी मिळाली होती.

यापूर्वी एकदा राहुल आणि प्रियंका गांधी पीडितेच्या कुटुंबियांना भेटायला गेले असता त्यांना पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचे समोर आले होते. यानंतर त्यांनी शनिवारी पुन्हा हाथरसला जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ते 35 खासदारांना घेऊन पीडितेच्या घरी जाणार होते. यावेळी पोलिसांनी केवळ पाच जणांना सोबत घेऊन जाण्याची परवानगी दिली होती. पीडित कुटुंबाच्या भेटीनंतरच त्यांनी मोदी सरकारला हे सवाल विचारले आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!