दैनिक स्थैर्य | दि. १७ नोव्हेंबर २०२३ | फलटण |
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सन २०२१ मध्ये घेतलेल्या परीक्षेत फलटण तालुक्यातील चांभारवाडी गावची सून तसेच तांबवे गावातील श्री. रामदास पवार यांची कन्या सौ. प्रियांका सुनिल धुमाळ (पवार) यांची राज्य कर निरीक्षकपदी निवड झाली आहे. त्यांच्या या यशात त्यांची मेहनत, जिद्द व चिकाटी खूप महत्त्वाची ठरली आहे. हे यश मिळवताना पती सुनिल यशवंत धुमाळ यांनीही मोठी साथ दिल्याचे मत त्यांनी स्वतः व्यक्त केले. या यशाबद्दल त्यांचे सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन होत आहे.
ग्रामीण भागातील मुलांनीही मनापासून जिद्दीने अभ्यास केला तर कोणतेही यश मिळवणे अवघड नसल्याचे प्रियांका धुमाळ यांनी हे यश मिळवून सर्व ग्रामीण भागातील मुला-मुलींना दाखवून दिले आहे.
चांभारवाडी गावातील एवढे मोठे पद मिळवणारी ही पहिलीच महिला असल्याने तिने चांभारवाडी गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवून चांभारवाडी गावाबरोबरच तांबवे गावाचेही नाव उंचावले आहे.