दैनिक स्थैर्य | दि. 11 जानेवारी 2024 | फलटण | येथील डेंटल क्लिनिक असोसिएशनच्या डॉ. प्रितम दोशी यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे; तर उपाध्यक्षपदी डॉ. विजय दीक्षित, डॉ. संदीप धायगुडे यांची निवड करण्यात आली. सेक्रेटरी पदी डॉ. मनोज गांधी व खजिनदार पदी डॉ. सोनिया शहा यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली.
इंडियन डेंटल असोसिएशन बारामती फलटण शाखेच्या नवीन कार्यकारणीच्या निवडीचा कार्यक्रम फलटण येथील अशोका हॉटेल येथे संपन्न झाला.
या कार्यक्रमात दंतवैद्यकीय क्षेत्रात 50 वर्षे सेवा केल्याबद्दल डॉ. अशोक व्होरा यांचा शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास डॉ. नेत्रा कांची, डॉ. शीतल झगडे, डॉ. तेजस्वीनी देशपांडे, डॉ. वीजय दिक्षीत, डॉ. सदिंप धायगुडे, डॉ. सोनिया शहा, डॉ. गौरी दिक्षीत, डॉ. प्रज्ञा गांधी, डॉ. सौरभ दोशी, डॉ. नेहा दोशी, डॉ. केतकी नाळे, डॉ. स्वाती दोशी, डॉ. मयुर गायकवाड, डॉ. स्वप्नील निकम, डॉ. प्रदीप व्होरा, डॉ. वैशाली कोकरे, डॉ. विश्वराज निकम, डॉ. अशोक व्होरा, डॉ. राजेंद्र दोशी, डॉ. दिपक दोशी, डॉ. नरेंद्र पवार, डॉ. शहा, डॉ. सुधा शिंदे, डॉ. शील्पा दोशी, डॉ. प्रिती शहा, डॉ. मनिषा काकडे, डॉ. प्रितम लवगारे, डॉ. सुशील राऊत, डॉ. चेतन गुदेचा, डॉ. रोहित सांघवी, डॉ. काजल शेंडे, डॉ. अमर अभंग, डॉ. मानवी अरोरा व फलटण, बारामती परिसरातील दंतवैद्य उपस्थित होते.