दैनिक स्थैर्य । दि. २४ ऑगस्ट २०२२ । मुंबई । आदिवासी पाडे आणि वस्त्या वाड्या मुख्य शहरांशी जोडण्यासाठी प्राधान्याने काम केले जाईल, असे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी आज विधानसभेत सांगितले.
सदस्य प्रताप सरनाईक, दौलत दरोडा यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली.
आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी सांगितले की, आदिवासी पाडे, वस्ती यांना नागरी सुविधा पुरविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम, ग्रामीण विकास, शालेय शिक्षण आणि वन विभाग या सर्वांत एकत्रित समन्वय साधला जाईल, असेही त्यांनी सांगितले. जलजीवन मिशन अंतर्गत सर्व आदिवासी पाडे आणि वस्त्या वाड्या येथे पाणी पुरवठा योजना राबविण्यासाठी प्रयत्न केला जाईल असेही त्यांनी सांगितले.
याबाबतच्या चर्चेत विरोधी पक्षनेते अजित पवार, नाना पटोले, योगेश सागर आदी सहभागी झाले होते.