कोळकीत जुगार अड्डयावर छापा; इतरही अवैध व्यवसायांचा पर्दाफार्श करण्याची ग्रामस्थांची मागणी


स्थैर्य, कोळकी, दि. २१ : फलटण शहराशेजारी वेगाने विस्तारणार्‍या कोळकी हद्दीत अनेक अवैध व्यवसाय सुरु आहेत. दि.१९ मे रोजी शिंगणापूर रस्त्याजनजिक असणार्‍या ग्रामंचायतीच्या उद्यानाजवळ रात्री दहा वाजणेचे सुमारास शहर पोलिसांनी छापा मारला त्यावेळी तेथे विशाल शंकर अहिवळे, अजय बाळू अहिवळे, निखिल विजय मोरे, भोला बापू अहिवळे सर्व रा.मंगळवार पेठ,फलटण व अविनाश सुरेश सरतापे रा.शिवाजीनगर,फलटण हे स्वत:चे फायद्याकरिता तीन पानी पत्त्यांचा जुगार खेळताना आढळून आले. यावेळी पोलिसांनी रु 33,090/- रुपये ताब्यात घेतले. याबाबत पोलिस कॉन्स्टेबल नितिन दिलीप चतुरे यांच्या फिर्यादीवरुन कलम 173/2020 नुसार फलटण शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलिस नाईक सुळ करत आहेत. ह्या बरोबरच फलटण पोलीस प्रशासनाने कोळकीमध्ये चालणाऱ्या इतरही अवैध्य व्यवसायांचा पर्दाफार्श करावा अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!