
दैनिक स्थैर्य । दि. १७ जानेवारी २०२३ । राजाळे । श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या श्री जानाई हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, राजाळे या विद्यालयाचे प्राचार्यपदी वा. अ. नेरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानिमित्त त्यांचे स्वागत सेवा निवृत्त प्राचार्य एल. जी. बेंद्रे यांनी बुके व शाल देऊन केले.
वा. अ. नेरकर हे इंग्रजी विषयाचे उत्तम अध्यापक म्हणून प्रसिद्ध आहेत. नियुक्ती बद्दल त्यांचे श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माननीय सुभाषराव नामदेवराव सूर्यवंशी – बेडके, मानद सचिव सचिन सूर्यवंशी – बेडके, संचालक महेंद्र सूर्यवंशी – बेडके, राजाळे गावच्या सरपंच सौ. सविता शेडगे, माजी सरपंच संभाजी निंबाळकर यांनी अभिनंदन केले आहे.