दैनिक स्थैर्य । दि. २० जून २०२२ । सातारा । औद्यागिक प्रशिक्षण संस्था सातारा येथे दि, 13 जून रोजी प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ भरती मेळावा (पीएमएनएएम) संपन्न झाला. या मेळाव्याचे उद्घाटन जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता विभागाचे सहाय्यक आयुक्त सुनील पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी लार्सन अँड टुब्रो पनवेल,गोदरेज बॉईज शिरवळ,टाटा मोटर्स पुणे,कुपर कार्पोरेशन सातारा,डेलवाल फ्लो कंट्रोल शिरवळ,रीएटर इंडिया शिरवळ,गजानन ऑटोमोबाइल सातारा,कमिन्स इंडिया फलटण,टाटा कमिन्स फलटण,एशियन पेंट शिरवळ,जॉन डिअर पुणे,के बोव्हेट सातारा,स्पाइसर इंडिया सातारा,ब्रोस इंडिया लिमिटेड पुणे,भारत युवा शक्ति फाउंडेशन पुणे,किर्लोस्कर चिलर्स खंडाळा,महाराष्ट्र स्कूटर्स लि सातारा,युनि ऑटोमेशन सातारा महिंद्रा आणि महिंद्रा चाकण पुणे, निप्रो इंडिया लि शिरवळ, गरवारे टेक्निकल फायबर वाई, टीम प्लस एच आर सातारा अशा एकूण २२ नामांकित कंपन्यानी या प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ भरती मेळाव्यात भाग घेतला होता.
सातारा जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील ८९९ उमेदवार उपस्थित होते. एक उमेदवार जास्तीत जास्त चार कंपन्या साठी मुलाखत देवू शकत होता. या प्रमाणे सर्व उमेदवारांच्या मुलाखती होऊन त्याच दिवशी ४८९ उमेदवारांची निवड करण्यात आली.
या प्रसंगी नीलेश महात्मा गांधी राष्ट्रीय फेलो मानसी अहेर, संस्थेचे उपप्राचार्य संजय मांगलेकर ,सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार मिलिंद उपाध्ये, कनिष्ठ प्रशिक्षणार्थी सल्लागार पी वाय बगाडे उपस्थित होते.