स्थैर्य, नवी दिल्ली, दि.21: पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोना व्हॅक्सीनेशनच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये लस घेणार आहेत. मीडिया रिपोर्ट्समध्ये हा दावा केला जात आहे. कोरोना व्हॅक्सीनविषयी काही लोक प्रश्न उपस्थित करत आहेत. काँग्रेसह विरोधी पक्षांच्या काही नेत्यांनी म्हटले होते की, पंतप्रधानांनी स्वतः पहिले लस घ्यायला हवी होती.
पहिल्या टप्प्याचे व्हॅक्सीनेशन 16 जानेवारीपासून सुरू झाले होते. यामध्ये 3 कोटी फ्रंटलाइन वर्कर्सला लस दिली जाणार आहे. यानंतर 50 वर्षांपेक्षा जास्त वयस्कर लोकांना आणि गंभीर आजारांचा सामना करत असलेल्या 50 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांना व्हॅक्सीन दिली जाईल. दुसरा टप्पा कधी सुरू होणार आहे याविषयी अद्याप माहिती देण्यात आलेली नाही.
मोदींनी म्हटले होते – दुष्प्रचारपासून दूर राहा
कोरोना व्हॅक्सीनची सुरुवात करताना मोदी म्हणाले होते की, ‘तुम्ही कोणत्याही प्रकारचा प्रोपोगंडा किंवा दुष्प्रचारपासून दूर रहायला हवे. आपल्या वैज्ञानिकांवर जगाचा विश्वास आहे. आपण हा विश्वास आपल्या ट्रॅक रेकॉर्डने मिळवला आहे. तुम्हाला खूप अभिमान वाटले की, जगातील जेवढ्या मुलांना जीवनरक्षक लसी दिल्या जातात त्यामधील 60% भारतात तयार होतात’