स्थैर्य, नवी दिल्ली, दि.१९ : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ख्रिस्ती धर्मगुरू डॉ. जोसेफ मार थोमा मेट्रोपोलिटन यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. मोदींनी त्यांच्या निधनावर दु:ख व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली. डॉ. जोसेफ हे केरळमधील तिरुवल्ला येथील मार थोमा चर्चचे प्रमुख होते.
यावर्षी २६ जूनला डॉ. जोसेफ मार थोमा यांचा ९० वा वाढदिवस झाला. त्यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमाला मोदींनी संबोधित केले होते. या स्मृतींना पंतप्रधानांनी उजाळा दिला. ‘डॉ. मार थोमा हे अप्रतिम व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी मानवतेसाठी आणि गरीब, दीनदुबळे वंचितांचे जीवन सुधारण्यासाठी कठोर परिश्रम घेतले. त्यांच्यामध्ये सहानभूती आणि मानवता मोठ्या प्रमाणात होती. त्यांचे उच्च विचार कायमच लक्षात राहतील. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो’, असे ट्विट मोदींनी केले आहे.