लायन्स क्लब फलटणच्या अध्यक्षपदी ला. डॉ. तुषार गायकवाड तर लायन्स क्लब फलटण गोल्डनच्या अध्यक्षपदी ला. निलम देशमुख

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २ जुलै २०२३ | फलटण | लायन्स इंटरनॅशलन ही जगातील सर्वात मोठी स्वयंसेवी संस्था ‘वी सर्व्ह’ ब्रीद घेऊन, संपूर्ण जगभर मागील 105 वर्षांपासून सेवाकार्यात अग्रेसर आहे. जगात 210 देशांमध्ये मुख्यत्वे अंधत्व, पर्यावरण, भुकेलेल्या अन्न, मधुमेह, लहान मुलांमधील कॅन्सर यामध्ये मोठ्या प्रमाणात सेवाकार्य करीत असून जगापुढे येऊ घातलेल्या ग्लोबल वार्मिंगच्या संकटावर मात करण्यासाठी लायन्स क्लब्जने जास्तीत जास्त पुढाकार घेऊन काम करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत माजी प्रांतपाल एमजेएफ लायन बी.एल.जोशी यांनी व्यक्त केले.

लायन्स क्लब फलटण व लायन्स क्लब फलटण गोल्डन या क्लबच्या पदग्रहण समारंभाप्रसंगी ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर नवनिर्वाचित प्रांतपाल एमजेएफ लायन भोजराज नाईक निंबाळकर, माजी प्रांतपाल प्रा.डॉ.राजेंद्र शहा, क्लबचे मावळते अध्यक्ष लायन विजयकुमार लोंढे-पाटील, लायन सुनंदा भोसले, रिजन चेअरमन ला.बाळासाहेब शिरकांडे, झोन चेअरमन ला.निलम लोंढे-पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

नवनिर्वाचित लायन्स क्लब फलटणचे अध्यक्ष डॉ.तुषार गायकवाड व लायन्स क्लब फलटण गोल्डनच्या अध्यक्षा ला.निलम देशमुख यांच्यासह सर्व पदाधिकार्‍यांना लायन बी.एल.जोशी यांनी शपथ देऊन त्या त्या पदाचे महत्व व त्याची जबाबदारी विषद केली.

यावेळी पुढे बोलताना लायन बी.एल.जोशी म्हणाले, माऊलींची पालखी आपल्या फलटण शहरातून जात असते या सोहळ्यात सहभागी होणार्‍या वारकर्‍यांसाठी लायन्स क्लब फलटण व लायन्स क्लब फलटण गोल्डनच्या माध्यमातून अन्नदान, मोफत दवाखाना, मोफत पिण्याचा पाण्याचा टँकर हे मोठे सर्वाकार्य करीत असल्याचे सांगून लायनिझम सदस्य हा केंद्रबिंदू मानून तयार झालेले आहे. लायन्स सदस्याने सेवाकार्यात सहभागी होऊन समाजातील गरजूंपर्यंत पोहोचवून लायनिझमची प्रतिमा वृद्धींगत करण्यावर भर द्यावा. यातूनच उद्याचे उत्तम नेतृत्व पुढे येऊ शकतं असे सांगून जास्तीत जास्त सदस्यांनी मेल्विन जोन्स फेलोशीप घेऊन या सेवाकार्यात आपला वाटा उचलावा असे आवाहन केले.

नवनिर्वाचित प्रांतपाल एमजेएफ लायन भोजराज नाईक निंबाळकर यांनी प्रांतपाल होण्याची संधी दिल्याबद्दल डिस्ट्रिक्ट 3234 डी-1 च्या सर्व क्लब सदस्य व पदाधिकार्‍यांचे आभार मानून माझ्यावर जी मोठी जबाबदारी टाकली आहे ती निश्चितच यशस्वी करण्याचा विश्वास व्यक्त केला. वर्ष 2023-24 च्या काळात राबविण्यात येणार्‍या ‘सेवांजली’ या उपक्रमाची सविस्तर माहिती देऊन सर्व क्लब्जनी सेवांजली कार्यक्रमांतर्गत जास्तीत जास्त सेवाकार्य करण्याचे आवाहन केले.

यावेळी नुतन अध्यक्ष ला.डॉ.तुषार गायकवाड व ला.निलम देशमुख यांनी सेवाकार्य निरंतर सुरु राहण्याची ग्वाही देऊन येणार्‍या वर्षामध्ये क्लब निश्चितच चांगली कामगिरी करेल असा विश्वास व्यक्त केला.

मावळते अध्यक्ष ला.विजयकुमार लोंढे-पाटील व ला.सुनंदा भोसले यांनी मागील वर्षी केलेल्या सेवाकार्याचा आढावा घेऊन सर्व सदस्यांनी सहकार्य केल्याबद्दल आभार व्यक्त केले.

माजी प्रांतपाल प्रा.डॉ.राजेंद्र शहा, रिजन चेअरमन ला.बाळासाहेब शिरकांडे व झोन चेअरमन ला.निलम लोंढे-पाटील यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष व सर्व पदाधिकारी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.

यावेळी नवनिर्वाचित प्रांतपाल एमजेएफ लायन भोजराज नाईक निंबाळकर यांचा क्लब्ज्च्या वतीने सत्कार करण्यात आला. नुकतेच सांगली येथे कर्तृत्व गौरव अ‍ॅवॉर्ड नाईटमध्ये डिस्ट्रिक्टमध्ये प्राप्त झालेल्या अ‍ॅवॉर्डचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ला.रणजित निंबाळकर यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात ला.निलम देशमुख यांनी ईशस्तवन करुन केली. उपस्थितांचे आभार ला.रविकांत इंगवले यांनी मानले. कार्यक्रमास लायन्स सदस्य, दोन्ही क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!