वाचनातून सांस्कृतिक ठेवा जपणे काळाची गरज – श्रीमंत संजीवराजे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २ सप्टेंबर २०२४ | फलटण |
आई प्रतिष्ठान वाठार निंबाळकर आयोजित जिल्हास्तरीय ‘आई सन्मान पुरस्कार २०२४’ व ‘राज्यस्तरीय आई प्रतिष्ठान वाचन प्रेरणा पुरस्कार’ वितरण सोहळा नुकताच पार पाडला.

याप्रसंगी बोलताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर म्हणाले की, वाचन प्रेरणा ही काळाची गरज आहे आणि वाचनातूनच आपला सांस्कृतिक ठेवा आपण जपला पाहिजे. सन २०१७ पासून गेली सात वर्षे वाठार निंबाळकरचे आई प्रतिष्ठान हे आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा, पुस्तक वाटप, वृक्षलागवड इ. वेगवेगळे उपक्रम राबवित असते. तसेच नव्याने सुरू केलेला ‘राज्यस्तरीय आई प्रतिष्ठान वाचन प्रेरणा पुरस्कार’ हा उपक्रम अतिशय स्तुत्य असून विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यांनी वेगवेगळी प्रेरणादायी पुस्तक वाचल्यानंतर त्यांच्या मनामध्येही चांगल्या विचारांची पेरणी झालेली दिसून येते.

आमदार दीपकराव चव्हाण यांनीही आई प्रतिष्ठानचे अतिशय चांगले कार्य चालू आहे. आईच्या आठवणीत दोघे बंधू व तांबे परिवार सर्वांना प्रेरणा देण्याचे काम करत असतात.

अ‍ॅड. मधुबाला भोसले यांनी आई प्रतिष्ठानचे व वाचन प्रेरणा या नवीन उपक्रमाचे कौतुक केले. वाचनातून चांगले संस्कार व चांगले विचार मनात येतात, असे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला वाठार गावच्या सरपंच सुवर्णा नाळे, उपसरपंच अमृत निंबाळकर, विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, पत्रकार, ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी पत्रकार विकास शिंदे, पोलीस अधिकारी अतुल कुंभार, वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण तारकर, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम उपजिल्हा रुग्णालय फलटण, उषा तरटे अंगणवाडी सेविका, हरिदास जगदाळे, वारकरी संप्रदाय, प्राचार्य नागेश पाठक, सहकार महर्षी हणमंतराव पवार हायस्कूल व जुनिअर कॉलेज फलटण, प्राचार्य, रॉयल इंग्लिश स्कूल जावली समीर गावडे, मुख्याध्यापिका, स्वर्गीय शिलादेवी शरदकुमार दोशी प्राथमिक विद्यामंदिर कोळकी प्रज्ञा काकडे, क्रीडाशिक्षक सर लष्कर श्रीमंत बाबाराजे खर्डेकर हनुमंतवाडी जनार्दन पवार, प्रा. विजयकुमार निंबाळकर इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी, मारुतराव माने कनिष्ठ माध्यमिक विद्यालय देऊर, विद्या शिंदे वरिष्ठ मुख्याध्यापिका, निंबळक, अमोल माने प्राथमिक शाळा विठ्ठलवाडी (कवठे) वाई, संजय संकपाळ, प्राथमिक शाळा वेंगळे वरचीवाडी महाबळेश्वर, नितीन जाधव पदवीधर शिक्षक प्राथमिक शाळा आलेवाडी, तालुका जावली, राजेंद्र बोबडे प्राथमिक शाळा कासानी (पोस्ट रोहोट), तालुका सातारा, वर्षा ससाणे (नेवसे)प्राथमिक शाळा कवठे खंडाळा, रामचंद्र घाडगे, प्राथमिक शाळा कामठी पोपळकरवाडी खटाव, विद्या लेंभे प्राथमिक शाळा सोनके तालुका कोरेगाव, लीना वैद्य प्राथमिक शाळा पवारमळा (चरेगाव) कराड, मनोजकुमार कोरडे प्राथमिक शाळा बाजे मारुल तालुका पाटण, शुभांगी बोबडे प्राथमिक शाळा दरावस्ती (टाकेवाडी) तालुका माण, छाया जाधव प्राथमिक शाळा फडतरवाडी, विजयकुमार नाळे प्राथमिक शाळा मांगोबामाळ निंबळक, वैशाली जगताप प्राथमिक शाळा जननीमळा गिरवी, विकास भुजबळ प्राथमिक शाळा सोमंथळी, तानाजी कुलाळ प्राथमिक शाळा कुलाळवस्ती, शितल रिटे प्राथमिक शाळा कोर्‍हाळे यांना जिल्हास्तरीय आई सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच राज्यस्तरीय आई प्रतिष्ठान वाचन प्रेरणा पुरस्कार १४ विद्यार्थ्यांना देण्यात आले. त्या सर्वांचा या ठिकाणी सन्मान करण्यात आला.

आई प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे संपूर्ण जिल्ह्यातून कौतुक होत आहे. प्रास्ताविक आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश तांबे यांनी केले.


Back to top button
Don`t copy text!