शासकीय कार्यालयांमधील गट क व गट ड पदांच्या नियुक्तीसाठी 23 जुलै रोजी पूर्वतयारी बैठक


दैनिक स्थैर्य । 22 जुलै 2025 । सातारा । अनुकंपा नियुक्तीचे सुधारीत सर्वसमावेशक धोरण 17 जुलै 2025 रोजीच्या शासननिर्णयाद्वारे ठरविण्यात आले आहे. मुख्यमंत्री यांच्या 150 दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत अनुकंपा नियुक्ती देण्याचे वेळापत्रक सामान्य प्रशासन विभागाकडून नेमून दिलेले आहे.

यानुसार सातारा जिल्ह्यामध्ये कार्यरत असणार्‍या शासकीय कार्यालयांमधील गट क व गट ड पदांच्या सर्व नियुक्ती प्राधिकार्‍यांची पूर्व तयारी बैठक 23 जुलै 2025 रोजी सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी दिली.

या बैठकीमध्ये प्रतिक्षासुची अद्यायावत करणे, गट बदलणे, अनुकंपा नियुक्तीसाठी उपलब्ध पदांची परिगणना करणे, गट ड मध्ये अनुकंपा नियुक्तीसाठी पदे पूनर्जिवीत करण्याचा प्रस्ताव प्रशासकीय विभागाच पाठविण्याबाबत तयारी करण्याच्या दृष्टीने आढावा घेण्यात येणार आहे. काही विभागांमध्ये गट -क व गट ड संवर्गातील पदांचे नियुक्तीचे अधिकार विभागीय स्तरावर असतात.

जरी पद भरतीचे अधिकार विभागीय स्तरावर असले तरी सुध्दा कार्यालयप्रमुखांनी त्यांच्या विभागाचे जिल्हास्तरावरील प्रतिनिधी म्हणून अनुकंपा नियुक्तीच्या अनुषंगाने जिल्हा कार्यक्षेत्राचे कामकाजासाठी उपस्थित रहावे, असे सर्व कार्यालयप्रमुखांना कळविण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!