विधानसभेला फलटणमध्ये कमळ फुलणार?; तालुक्याचा सुपुत्रच आमदार होणार?; भाजपाची विधानसभेची तयारी सुरू

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. 11 जुन 2024 | फलटण | लोकसभा निवडणूक झाल्यानंतर सर्वच पक्ष हे विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. माढा लोकसभेच्या निवडणुकीत जरी भारतीय जनता पार्टीला यश आले नसले तरी आता फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची निवडणूक ही भारतीय जनता पार्टी आता सक्षमपणे लढवणार असल्याची खात्रीशीर माहिती समोर येत आहे. यामध्ये फलटण तालुक्याचा सुपुत्रच भाजपाचा झेंडा हातात घेवून फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा कमळ फुलवणार असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये फलटण तालुक्याच्या सर्व गावांमधून भारतीय जनता पार्टीला अर्थात रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मताधिक्य आहे. 2019 पेक्षा जवळपास 14 पटीने अधिक मते ही 2024 साली रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मिळाली आहेत. यासोबतच भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटण तालुक्यात विविध विकासकामे ही केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून मार्गी लावली आहेत. यामुळेच लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला फलटण विधानसभा मतदारसंघातून मताधिक्य मिळाले आहे. याचाच फायदा आता आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपा उचलणार आहे.

रणजितसिंह यांच्या माध्यमातून तालुक्याचा विकास

माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून फलटण तालुक्याचा रखडलेला विकास मार्गी लावण्याचे काम भारतीय जनता पार्टीने केला आहे. तालुक्याच्या दृष्टीने महत्वाचा असलेला नीरा – देवधर प्रकल्प, धोम – बलकवडी कॅनॉल बारमाही करण्याचे काम, फलटण येथे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय, उप प्रादेशिक परिवहन कार्यालय यासह अनेक विकासकामे मार्गी लावले आहेत. यामुळेच फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून लोकसभेला भारतीय जनता पार्टीला मताधिक्य मिळाले आहे. आगामी विधानसभेला सुद्धा याचा फायदा भारतीय जनता पार्टीला मिळणार आहे; असे मत व्यक्त होत आहे.

तालुक्यासाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरणारा आमदार हवा

तालुक्याची पूर्वीची परिस्थिती व आताची परिस्थिती या मध्ये जमीन आसमनाचा फरक आहे. ज्या आमदारांना फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाने सलग 3 वेळा निवडून पाठवले आहे. ते आमदार तालुक्याच्या प्रश्नासाठी कधीही फलटण, सातारा किंवा अगदी पुणे, मुंबईमध्ये रस्त्यावर उतरताना दिसले नाहीत. का याउलट आपले पाणी बारामतीला देण्यासाठीच त्यांच्या वरिष्ठ नेत्यांच्या संमतीने 15 वर्षे शांत बसले होते का ? असा सवाल आता उपस्थित राहत आहे.

विधानसभा प्रभारी सचिन कांबळे – पाटील प्रबळ दावेदार

भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रगतशील शेतकरी सचिन कांबळे – पाटील हे प्रबळ दावेदार असल्याची भाजपा पक्षश्रेष्ठी सुद्धा नक्कीच त्यांना संधी देतील; असा विश्वास व्यक्त केला जात आहे. सचिन कांबळे – पाटील यांनी पूर्वी व्यावसायिक म्हणून उत्कृष्ठ असे काम केले होते. त्यानंतर ते शेती व्यवसायाकडे ते वळले व त्यानंतर त्यांनी शेती मध्ये सुद्धा विविध प्रयोग राबवत प्रगतशील शेती केली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत जर भारतीय जनता पार्टीने त्यांना संधी दिली तर तालुक्यातून त्यांना नक्कीच मताधिक्य मिळेल; असा विश्वास व्यक्त केला जात आहे.


Back to top button
Don`t copy text!