दैनिक स्थैर्य । दि. ०४ डिसेंबर २०२२ । फलटण । आपली एकता हीच आपली समानता एचआयव्ही बाधितांसहित आहे. तरुण व तरुणींना लग्न जमवताना कुंडली पाहण्याऐवजी एचआयव्ही चाचणीला प्राधान्य द्यावे, असे आवाहन फलटण उपजिल्हा रुग्णालयाचे एआरटी सेंटरचे डॉ. चंद्रशेखर जगताप यांनी केले.
फलटण एजुकेशन सोसायटीचे, महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी संलग्न श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषि महाविद्यालय फलटण येथे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने जागतिक एड्स दिनानिमित्त राष्ट्रीय एड्स नियंत्रण जनजागृति व्याख्यानपर कार्यक्रम संपन्न झाला. या कार्य्रकमामध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून फलटण उपजिल्हा रुग्णालयाचे ए. आर. टी. सेंटरचे डॉ. चंद्रशेखर जगताप, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी सचिन देवकाते यांचे मार्गदर्शन लाभले.
समुपदेशक मा.श्री. सचिन देवकाते यांनी मार्गदर्शनपर माहितीमध्ये एच.आई.व्ही. उत्पत्ती, एच. आई.व्ही. इतिहास , एड्स माहिती असणे का गरजेचे आहे, एड्स संसर्गची कारणे, लक्षणे, दुष्परिणाम व सावधानता याबद्दल माहिती सांगितली. तसेच एच.आई.व्ही. तपासणी साठि एकात्मिक समुपदेशन केंद्र (ICTC), पी.पी.टी.सी.टी. कार्यक्रम ,ए.आर.टी. औषधोपचार या बद्दल माहिती देऊन विद्यार्थ्यांना जागतिक एड्स दिनानिमित्त एड्स प्रतिबंध शपथ दिली आहे.
हा कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निबांळकर यांच्या उपस्थितिमध्ये व मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. पी. टी. दावणे व सर्व स्वयंसेवक यांनी संपन्न केला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेविका कु. मृणाल देवकाते व कु. गौरी कापसे यांनी केले तसेच आभार मानले. स्वयंसेवक अभिजीत कुलकर्णी यानी केले.